नवी दिल्ली : वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमोडिटीच्या किमतीबाबत मंगळवारी आयएमसीची (IMC) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत एमआरपी, तेलबियांचा स्टॉक लिमिट यावर फेरविचार करण्यात येणार आहे. याशिवाय, स्टॉक लिमिट आणि पामतेल (Palm Oil) फ्युचर्स यावरही चर्चा होणार आहे.
याआधी शुक्रवारी अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाबाबत चर्चा केली. या बैठकीत खाद्यतेलाची एमआरपी प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांनी कमी करण्यास सांगण्यात आले. TRQ क्वांटिटी आणि पाम तेलाच्या फ्युचर्स ट्रेडिंगबद्दलही चर्चा झाली. तसेच, याचा दरावर होणारा परिणाम याबाबतही चर्चा झाली.
सणासुदीच्या काळात वस्तूंच्या किमती वाढू नयेत, हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी बाजारात पुरेसा साठा उपलब्ध असायला पाहिजे. या बैठकीत गव्हाच्या आयातीवरील शुल्क कमी करण्यावरही विचार केला जाणार आहे. तसेच, तांदळाच्या वाढत्या किमती आणि पेरणीचा कमी अंदाज पाहता निर्यातीवर नियमन करण्याबाबत आणि खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये आणखी कपात करण्याबाबतही चर्चा होऊ शकते.
याआधी, अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोया तेलाबाबत चर्चा केली. या बैठकीत स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती 8 ते 15 रुपयांनी कमी करण्याचे सांगण्यात आले. TRQ क्वांटिटी आणि पाम तेलाचे फ्युचर्स ट्रेडिंग यावर चर्चा झाली होती. अन्न सचिवांनी खाद्यतेल संघटनांना आयातीवरील निर्भरता कमी करण्यास आणि देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकारसोबत काम करण्यास सांगितले.