Join us

Educational Budget 2020 : शिक्षण क्षेत्राला मोदींकडून बूस्ट; 99,300 कोटी रुपयांची भरीव तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 2:06 PM

Educational Budget 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला बजेट सादर केला.

ठळक मुद्देया बजेटमध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अनेक शैक्षणिक संस्था उघडणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.2020-21च्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला बजेट सादर केला. या बजेटमध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 2020च्या बजेटमधून शिक्षण क्षेत्राला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. अनेक शैक्षणिक संस्था उघडणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. 2020-21च्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या बजेटमध्ये देशात दोन नवी विश्वविद्यालयं स्थापित करण्याचं सांगण्यात आलं आहे. 

राष्ट्रीय पोलीस विश्वविद्यालय (National Police University) आणि राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय (National Forensic Science University) तयार करण्यात येणार आहेत. तसेच पीपीपी मॉडलवर मेडिकल कॉलेज उघडण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. शिक्षणासाठी एफडीआय(FDI)चा अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच पदविका अभ्यासक्रमासाठी 2021 नवी संस्थानं उघडण्यात येणार आहेत. 

वंचितांसाठी डिग्रीच्या स्तरावर ऑनलाइन शिक्षा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षक, नर्सेस आणि चिकित्सा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्टडी इन इंडिया कार्यक्रमांतर्गत इंड-सॅटच्या आशिया आणि आफ्रिकेतील संचालनासाठी घोषणा केलेली आहे. क्वांटम तंत्रज्ञान आणि अनुप्रयोगासाठी 8 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय भरती एजन्सी(NRA - National Recruitment Agency)ची स्थापन केली जाणार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा 

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण

Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर

टॅग्स :बजेटबजेट क्षेत्र विश्लेषणअर्थसंकल्पीय अधिवेशन