Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफचा आणखी पैसा ईटीएफमध्ये?

ईपीएफचा आणखी पैसा ईटीएफमध्ये?

ईटीएफद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत नफा होत आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ईटीएफद्वारे शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

By admin | Published: June 29, 2016 04:26 AM2016-06-29T04:26:03+5:302016-06-29T04:26:03+5:30

ईटीएफद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत नफा होत आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ईटीएफद्वारे शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

EFF more money in ETF? | ईपीएफचा आणखी पैसा ईटीएफमध्ये?

ईपीएफचा आणखी पैसा ईटीएफमध्ये?


नवी दिल्ली : ईटीएफद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत नफा होत आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ईटीएफद्वारे शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. याबाबत ७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही माहिती दिली.
कामकाजाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेशी निगडित मुद्यावरील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय यांनी ही माहिती दिली. ईटीएफमध्ये ईपीएफओच्या गुंतवणुकीवर एक अहवाल केंद्रीय न्यासी बोर्डाच्या (सीबीटी) समोर मांडण्यात येणार आहे. हा अहवाल चांगला आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचा विचार करू. त्यामुळे त्यात गुंतवणुकीचे प्रमाणही वाढेल, असे बंडारू दत्तात्रय म्हणाले.
७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगारमंत्रीच राहतील. त्या बैठकीत गुंतवणुकीबाबत विस्तृत चर्चा होईल. एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ईटीएफ) युनिटस्ना बाजारात शेअर्सप्रमाणे खरेदी केले जाऊ शकते किंवा विकले जाऊ शकते. या फंडाचा पैसा निवडक शेअर्समध्ये बॉण्डस्, वस्तू आणि सूचकांक आधारित अनुबंधात लावला जाऊ शकतो.
दत्तात्रय म्हणाले की, ‘ईपीएफओ विश्वस्त मंडळ विविध संबंधित पक्षांशी विचारविनिमय केल्यानंतर ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या वर्षात गुंतवणुकीचे प्रमाण पाच टक्के होते. गुंतवणूक पॅटर्ननुसार हे प्रमाण १५ टक्के केले जाऊ शकते. हा प्रस्ताव विधी विभागाकडे येईल. त्यानंतर तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: EFF more money in ETF?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.