Lokmat Money > बिझनेस न्यूज > उत्साहाअभावी बाजारात घसरण

उत्साहाअभावी बाजारात घसरण

चीनने व्याजदरात केलेली घट आणि आशिया बाजारात सकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराने घसरणीचा पाढा घोकला

By admin | Published: October 26, 2015 11:26 PM2015-10-26T23:26:32+5:302015-10-26T23:26:32+5:30

चीनने व्याजदरात केलेली घट आणि आशिया बाजारात सकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराने घसरणीचा पाढा घोकला

Efforts to fall on the market | उत्साहाअभावी बाजारात घसरण

उत्साहाअभावी बाजारात घसरण

मुंबई : चीनने व्याजदरात केलेली घट आणि आशिया बाजारात सकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराने घसरणीचा पाढा घोकला. भारती एअरटेल आणि एचडीएफसी लिमिटेडचे तिमाही परिणाम चांगले येऊनही गुंतवणूकदारांत उत्साह निर्माण झाला नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू आणि बँकिंग क्षेत्रात नफेखोरी झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) दिवसअखेर १०८.८५ अंकांनी घसरत २७,३६१.९६ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (एनएसई) ३४.९० अंकांनी खाली येत ८,२६०.५५ वर स्थिरावला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोपियन बाजारात सुरुवातीला संमिश्र वातावरण होते. चीनने व्याजदर घटविल्याने आशियातील बाजारात चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारात तेजी दरवळली. तथापि, हाँगकाँग बाजारात मात्र घसरण झाली.

Web Title: Efforts to fall on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.