Join us

Bank FD Investment Tips : बचतकर्त्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न, आता बँकांची एफडी ठरतेय फायद्याची!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 1:20 PM

बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

नवी दिल्ली : वाढलेली महागाई आणि रेपो दरातील वाढ यामुळे बचतकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे. अनेक वर्षांनंतर मुदत ठेवींवरील व्याजदर ८.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर सर्वाधिक आहे.

का वाढले व्याजदर?अलीकडच्या काळात कर्जांचा व्याजदर वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत ठेवींच्या व्याजात बँकांनी केली केलेली नाही. त्यामुळे ग्राहक बँकांत ठेवी ठेवण्यास उत्सुक नाहीत. याचा परिणाम म्हणून बँकांना ठेवींच्या व्याजदरांत वाढ करणे भाग पडले आहे.

एफडीसाठी कोणत्या बँकेत किती व्याज?
बँक   मुदत (दिवस)व्याजदर जेष्ठ नागरिक
बँक ऑफ इंडिया ४४४७.०५%७.५५%
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४४४७.३५%७.८५%
बँक ऑफ बडोदा   ३९९७.०५%  ७.५५%
कॅनरा बँक ४००७.१५%  ७.६५%
बँक ऑफ महाराष्ट्र २००७.००%७.५०%
पंजाब व सिंध बँक २२१८%८.५%
एसबीआय   ४००७.१०%७.६०%
आयडीएफसी फर्स्ट बँक १० वर्षे७.००%७.५%
युनियन बँक ८००७.३०%७.८०%
पंजाब नॅशनल बँक ६६६७.२५%७.७५%
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ९९९ ८.५१%८.५१%

 

टॅग्स :बँक ऑफ इंडियाएसबीआयपैसा