मुंबई : देशातील आघाडीच्या ट्रॅक्टर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या आयशर ट्रॅक्टर्स कंपनीने नुकतेच बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्स आणि अॅग्रिस्टार रोटोटिलर लाँच केले आहेत. या नवीन ट्रॅक्टरमध्ये एक्स्ट्रा हेवी ड्यूटी फ्रंट एक्सेल, साईडशिफ्ट, पॉवर स्टिअरिंग, सिंक्रोमेश गीअर बॉक्स आदी शेतीसाठी नावीन्यपूर्ण सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे डिझेल आणि वेळ दोन्हीची मोठी बचत होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
शेतीच्या विविध कामांचा विचार करून कंपनीने तयार केलेल्या अॅग्रिस्टार रोटोटिलरमध्ये मजबूत स्टील ब्लेडस्, दमदार रोटरशॉफ्ट, मल्टी स्पीड हेवी ड्यूटी गीअरबॉक्स देण्यात आला आहे. हा रोटोटिलर सर्व प्रकारच्या शेतजमिनींमध्ये उत्तम क्षमतेने काम करू शकतो, असे कंपनीने म्हटले आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत आयशरच्या दोन्ही उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना प्रतितास कमी डिझेल खर्च करून अधिक क्षेत्रावर कामे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकºयांची उत्पादकता वाढणार असून, राहणीमान सुधारणार आहे. शेतकºयांना उपयुक्त ठरतील, अशी गुणवत्तापूर्ण उत्पादने आयशर पुरवत आली आहे. (वा.प्र.)
आयशर कंपनीचे अत्याधुनिक ट्रॅक्टर्स, अॅग्रिस्टार रोटोटिलर
देशातील आघाडीच्या ट्रॅक्टर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या आयशर ट्रॅक्टर्स कंपनीने नुकतेच बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्स आणि अॅग्रिस्टार रोटोटिलर लाँच केले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:13 AM2019-07-15T04:13:47+5:302019-07-15T04:13:57+5:30