नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. वस्तू उत्पादन, खाण आणि वीजनिर्मिती क्षेत्राच्या कमजोर कामगिरीमुळे ही घसरण झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले. ही सलग सहाव्या महिन्यातील घसरण ठरली आहे. यंदा मार्चपासून औद्योगिक उत्पादन सातत्याने घटत आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार, (आयआयपी) वस्तू उत्पादन क्षेत्रात ८.६ टक्के घसरण झाली आहे. खाण आणि वीजनिर्मिती क्षेत्रात अनुक्रमे ९.८ टक्के आणि १.८ टक्के घसरण झाली आहे.जुलैच्या तुलनेत सुधारणाऔद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. ऑगस्टमधील घसरण आठ टक्के असली तरी जुलैच्या तुलनेत सुधारणा दिसून येत आहे. कारण जुलैमधील आयआयपीची घसरण १0.८ टक्के होती. मार्चपासून घसरण सुरू झाली. एप्रिल ते ऑगस्ट या काळात आयआयपीत २५ टक्के घसरण झाली आहे. खाद्यवस्तू आणि वाहतूक या क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे महागाईचा दर वाढत आहे. आयआयपीतील सततच्या घसरणीमुळे पतधोरण बैठकीत व्याजदरात कपात करणे रिझर्व्ह बँकेला कठीण जाईल.
औद्योगिक उत्पादनात आठ टक्क्यांची घसरण; व्याजदरात कपात करणे रिझर्व्ह बँकेला कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:08 AM