मुंबई - परीक्षा संपल्यामुळे शाळांनाही सुटी लागली आहे. त्यामुळे पर्यटनाला जाण्याचे बेत अनेकांनी आखले असतील. मात्र, त्यापूर्वी बॅंकेशी संबंधित काही काम असेल तर ते आधीच करून घ्या. कारण, मे महिन्यात बॅंका ८ दिवस बंद राहणार आहेत. विविध ठिकाणी स्थानिक सणांच्या वेगळ्या सुट्ट्या असतील. मे महिन्यात ४ रविवार आहेत.
या दिवशी बॅंका बंद
१ मे - महाराष्ट्र दिन/कामगार दिन
५ मे - बुद्ध पाेर्णिमा
७ मे - रविवार
१३ मे - दुसरा शनिवार
१४ मे - रविवार
२१ मे - रविवार
२७ मे - चाैथा शनिवार
२८ मे - रविवार