Join us

मे महिन्यात बॅंकांना आठ दिवस सुट्टी; 'या' दिवशी बँका राहणार बंद, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 6:12 AM

विविध ठिकाणी स्थानिक सणांच्या वेगळ्या सुट्ट्या असतील.

मुंबई - परीक्षा संपल्यामुळे शाळांनाही सुटी लागली आहे. त्यामुळे पर्यटनाला जाण्याचे बेत अनेकांनी आखले असतील. मात्र, त्यापूर्वी बॅंकेशी संबंधित काही काम असेल तर ते आधीच करून घ्या. कारण, मे महिन्यात बॅंका ८ दिवस बंद राहणार आहेत. विविध ठिकाणी स्थानिक सणांच्या वेगळ्या सुट्ट्या असतील. मे महिन्यात ४ रविवार आहेत. 

या दिवशी बॅंका बंद१ मे - महाराष्ट्र दिन/कामगार दिन५ मे - बुद्ध पाेर्णिमा७ मे - रविवार१३ मे - दुसरा शनिवार१४ मे - रविवार२१ मे - रविवार२७ मे - चाैथा शनिवार२८ मे - रविवार 

टॅग्स :बँक