मुंबई : शेअर बाजाराने गुरुवारीही गटांगळी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१४ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०९ अंकांनी काेसळला.
बुधवारी १,६०० पेक्षा जास्त अंकांनी काेसळल्यानंतर गुरुवारीही शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी काेसळला. मात्र, दिवसभरात ताे जवळपास ४०० अंकांनी सावरला.
नवा उच्चांक गाठल्यानंतर तीन दिवसांमध्ये सेन्सेक्स २,१४१ तर निफ्टी ६३५ अंकांनी काेसळले आहेत. एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल अनपेक्षित हाेते. त्याचा परिणाम गुरुवारीही बाजारावर दिसला.
पडझड कशामुळे?
महागाईचाही दर वाढला आहे.
कच्च्या तेलाचेही दर वाढले आहेत.
शेअर बाजारात उच्चांकी स्तरावरून नफा कमावण्यासाठी विक्रीचा मारा.
३८१ लाख काेटी एवढे सेन्सेक्सचे भांडवली मूल्य १५ जानेवारी राेजी हाेते.
३७४ लाख काेटी एवढे भांडवली मूल्य १८ जानेवारी राेजी हाेते.
१०,५७८ काेटी रुपयांचे शेअर्स परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विकले.