Lokmat Money > बिझनेस न्यूज > ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं! एका आठवड्यात कोट्यवधी कमावले, तर Reliance ला झटका

ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं! एका आठवड्यात कोट्यवधी कमावले, तर Reliance ला झटका

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. पण असं असतानाही आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:44 PM2022-11-20T14:44:44+5:302022-11-20T14:45:49+5:30

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. पण असं असतानाही आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे.

eight of top 10 firms market cap up icici bank biggest gainer investors wealth rise | ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं! एका आठवड्यात कोट्यवधी कमावले, तर Reliance ला झटका

ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं! एका आठवड्यात कोट्यवधी कमावले, तर Reliance ला झटका

नवी दिल्ली-

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. पण असं असतानाही आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. सेन्सेक्सच्या टॉप-१० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या कालावधीत या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण ४२,१७३.४२ कोटी रुपयांची वाढ झाली. 

पीटीआयच्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक सर्वात टॉपवर राहिली. तर इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीस कंपन्यांनीही आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा प्राप्त करुन दिला आहे. याशिवाय एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक आणि एचडीएफसी यांचाही समावेश आहे. अदानी एंटरप्राजयझेस आणि भारतीय एअरटेलच्या शेअर होल्डर्सनाही गेल्या आठवड्यात फायदा झाला आहे. 

तीन कंपन्यांना २७ हजार कोटींचा फायदा
आयसीआयसीआय बँकेचं मार्केट कॅपिटलायझेशन ९,७०६.८६ कोटी रुपयांनी वाढून ६,४१,८९८.९१ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस कंपनी आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ९,६१४.८९ कोटी रुपयांची वाढ झाली. या वाढीसह कंपनीचा एकूण मार्केट कॅप ६,७०,२६४.९९ कोटी रुपये इतका झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीसीएस कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये ९,४०३.७६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीची एकूण व्हॅल्यू आता १२,२२,७८१.७९ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

रिलायन्सच्या शेअर धारकांना मोठा तोटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्तान युनिलीवरच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे. रिलायन्सचा मार्केट कॅप २२,८६६.५ कोटी रुपयांनी कमी होऊन १७,५७,३३९.७२ कोटी रुपयांवर आला आहे. तर HUL कंपनीचा मार्केट कॅप ४,७५७.९२ कोटी रुपायांनी कमी होऊन एकूण ५,८३,४६२.२५ कोटी रुपयांवर आला आहे.   

Web Title: eight of top 10 firms market cap up icici bank biggest gainer investors wealth rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.