न्यूयाॅर्क : जगातील एका माेठ्या क्रिप्टाे एक्स्चेंजचा मालक एका रात्री अब्जाधीशाचा राेडपती झाला. मात्र, त्याच्या एक्स्चेंजमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एफटीएक्स या क्रिप्टाे एक्स्चेंजमधील गुंतवणूकदारांचे सुमारे आठ हजार काेटी रुपये एक्स्चेंजमधून गायब झाल्याची माहिती समाेर आली आहे.
एफटीएक्सचे संस्थापक सॅम बँकमन फ्रायड याने कंपनी बिनान्स या प्रतिस्पर्धी एक्स्चेंजला विकण्याबाबत घाेषणा केली. त्यानंतर राताेरात त्याची संपत्ती १५ अब्जांवरून शून्यावर आली. एफटीएक्सने दिवाळखाेरीसाठी अर्ज केल्यानंतर क्रिप्टाेबाजारात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता समाेर आलेल्या माहितीमुळे गुंतवणूकदारांची झाेप उडाली आहे. सॅम बँकमन यांनी काेणालाही न सांगता एफटीएक्समधून ग्राहकांचे १०० काेटी डाॅलर्स म्हणजे सुमारे आठ हजार काेटींहून अधिक रक्कम त्यांची ट्रेडिंग कंपनी अलामेडा रिसर्चमध्ये वळती केली. यानंतरच ग्राहकांच्या फंडापैकी माेठा हिस्सा गायब असल्याचे एका अहवालात समाेर आले आहे. कंपनीने ट्रेडिंग व पैसे काढण्याची सुविधा बंद केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे.
सॅम बँकमन यांनी दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत काही रेकाॅर्ड शेअर केले हाेते. त्यातून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समाेर आली. कंपनीतून गेल्या आठवड्यात बाहेर पडलेल्या यापैकी काही अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला व खळबळ उडाली.
एफटीएक्स क्रिप्टाे एक्स्चेंजमध्ये विविध देशांतील १३० कंपन्यांनी त्यांचे चलन लिस्ट केलेले आहे. (वृत्तसंस्था)
अनेक खात्यांना केले बेकायदा ॲक्सेस
n एफटीएक्सने आणखी एक दावा केला आहे की, अनेक खाती बेकायदेशीरपणे ॲक्सेस करण्यात आली आहेत.
n हा प्रकार झाल्यानंतरच ट्रेडिंग थांबविल्याचा दावा कंपनीने केला आहे.
n सुमारे ४७७ दशलक्ष डाॅलर्स एवढी रक्कम गायब असल्याचा दावा इलिप्टिक या संस्थेने केला आहे.
n यात कंपनीमधीलच वरिष्ठांपैकी काेणाचा तरी हात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आठ नव्हे १३ हजार काेटी रुपये गायब?
काही जणांनी दावा केला आहे की, ही रक्कम १.७ अब्ज डाॅलर्स म्हणजे सुमारे १३,६०० काेटी रुपयांहून अधिक आहे, तर काहींच्या दाव्यानुसार ही रक्कम २०० काेटी रुपयांपर्यंत असू शकते.