क्रिप्टोकरंसी (Cryptocurrency) ने जगभरातील अर्थव्यवस्थांची झोप उडविली आहे. एकीकडे बिटकॉईन(Bitcoin), इथेरम (Etherum) सारख्या प्रमुख क्रिप्टोकरन्सी असताना दुसरीकडे नवनवीन क्रिप्टोकरन्सींनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच काळात आता एक नवीन क्रिप्टोकरन्सी आली आहे, जिने दिलेला रिटर्न हैराण करणारा आहे. क्रिप्टो टोकन एकता (Ekta) मध्ये गेल्या आठवडाभरात २.९ अब्ज टक्क्यांची वाढ झाली आहे.
कॉइनमार्केटकैप (Coinmarketcap) वर मिळालेल्या माहितीनुसार एकता टोकनची व्हॅल्यू गेल्या सात दिवसांपूर्वी 0.00000001396 डॉलर होती. ती आता 0.4039 डॉलर झाली आहे. ही एका आठवड्यातील 2,893,266,376 टक्के वाढ आहे. याचाच अर्थ एका आठवड्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने यामध्ये १००० रुपये गुंतविले तर त्याचे 2,989.32 कोटी रुपये झाले आहेत.
एकताच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार ही फिजिकल असेट्स आणि कम्युनिटीजला ऑन चेन बनविण्याची ब्लॉकचेन आहे. या टोकनची लवकरच पब्लिक लिस्टिंग होणार आहे. याचे निर्माते बहुतांश परदेशी नागरिक असले तरी यामध्ये एकताचा को फाऊंडर हा योग सृष्टी नावाचा व्यक्ती आहे. आतापर्यंत एकताने सीड फंडिंग आणि प्रायव्हेट सेलद्वारे ५० लाख डॉलरहून अधिक रक्कम गोळा करण्यात यश मिळविले आहे. एवढ्या मोठ्या वाढीनंतरही हे टोकन जुन्या ऑल टाईम हायपासून कमीच आहे. ऑल टाईम हाय होण्यासाठी आणखी ९६ टक्के वाढ व्हायला हवी.
क्रिप्टोमार्केटमधील हिस्सेदारी खूप कमीसध्या या टोकनचा क्रिप्टोमार्केटमध्ये हिस्सा खूपच कमी आहे. Ekta Coin MCap ५० लाख डॉलरपेक्षा कमी आहे. याची 12,097,924 टोकन देण्यात आली आहेत. अधिकाधिक 420,000,000 टोकन दिली जाऊ शकतात.