Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता परमीटशिवाय पळवा गाड्या, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

आता परमीटशिवाय पळवा गाड्या, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

सियामच्या वार्षिक संमेलनात संबोधित करताना नितीन गडकरींनी ई-वाहनांवर जोर देणार असल्याचे सांगितले. सरकारने इलेक्टीक वाहन, एथेनॉल, बायो-डिझेल, सीएनजी, मेथनॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:42 PM2018-09-07T12:42:14+5:302018-09-07T12:45:01+5:30

सियामच्या वार्षिक संमेलनात संबोधित करताना नितीन गडकरींनी ई-वाहनांवर जोर देणार असल्याचे सांगितले. सरकारने इलेक्टीक वाहन, एथेनॉल, बायो-डिझेल, सीएनजी, मेथनॉल

Electric and cng vehicles can run without permit, transport minister nitin gadkari | आता परमीटशिवाय पळवा गाड्या, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

आता परमीटशिवाय पळवा गाड्या, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - देशातील इलेक्टीक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ई-वाहन आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना परमीटची गरज भासणार नसल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. तर, ई-वाहन उत्पादित कंपन्यांना ई-वाहन गाड्यांच्या निर्मित्तीकडे लक्ष देण्याचेही सांगितले आहे. तसेच ओला आणि उबर यांसारख्या कार सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांनीही ई-वाहनांचा जास्त वापर करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. 

सियामच्या वार्षिक संमेलनात संबोधित करताना नितीन गडकरींनी ई-वाहनांवर जोर देणार असल्याचे सांगितले. सरकारने इलेक्टीक वाहन, एथेनॉल, बायो-डिझेल, सीएनजी, मेथनॉल आणि जैव इंधन यांसारख्या पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या वाहनांना परमीटपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्य सरकारांनीही ई-वाहनांना सवलत देण्यास होकार दर्शविल्याचेही गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी ई-वाहन उत्पादिक कंपन्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कुठलिही आर्थिक मदत देण्यास स्पष्ट नकार दिला. सध्या, ई-वाहनांवर 12 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे कुठल्याही सबसिडीची गरज आहे. माझ्या मंत्रालयाने आगामी पाच वर्षात वित्तीय सहायताशिवाय ई-वाहनांच्या उत्पादनात वाढ करता येईल, याबाबतच अहवाल सादर केला आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Electric and cng vehicles can run without permit, transport minister nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.