Lokmat Money > बिझनेस न्यूज > Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

इलेक्ट्रीक कार तयार कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:35 PM2022-07-16T13:35:57+5:302022-07-16T13:36:20+5:30

इलेक्ट्रीक कार तयार कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे.

Electric car maker Omega Seiki to bring IPO Huge earning opportunity for investors earn | Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

इलेक्ट्रीक वाहन निर्माता Omega Seiki मोबिलिटी देखील आयपीओद्वारे (IPO) शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी करत आहे. कंपनी पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत 200 ते 250 मिलियन डॉलर्सचा IPO लॉन्च करेल.

ओमेगा सेकीचे संस्थापक उदय नारंग म्हणाले की, पूर्वी मार्च 2023 पर्यंत आयपीओ लॉन्च करण्याची योजना होती, परंतु आता काही महिन्यांनी विलंब झाला आहे. "आम्ही दोन, तीन आणि चारचाकी वाहनांव्यतिरिक्त प्रवासी विभागात आमची उपस्थिती वाढवत आहोत. त्यामुळे आम्हाला निधी उभारण्याची गरज आहे. त्याचा काही भाग आयपीओद्वारे उभारण्याची योजना आहे," असेही त्यांनी नमूद केले.

आयपीओची साईज 200-250 मिलियन डॉलर्सचा असण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित प्रस्तावांसंबधी मर्चंट बँकर्सना सहभागी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. Omega Seiki अँग्लियन ओमेगा समुहाचा भाग आहे. कंपनी कार्गो, प्रवासी इलेक्ट्रीक वाहनांशिवाय M1KA तयार करते. याशिवाय इलेक्ट्रीक टू व्हिलर्ससोबतच उच्च श्रेणीचे ट्रक्सही लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Electric car maker Omega Seiki to bring IPO Huge earning opportunity for investors earn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.