Electric Scooter Sales in India: मागील काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. देशातील EV स्कूटर मार्केटमध्ये Ola आणि Ather चे वर्चस्व आहे. या दोन अशा कंपन्या आहेत, ज्यांच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असते. पण आता वडोदरा येथील एक EV कंपनी, या दोन कंपन्यांच्या स्कूटरला टक्कर देत आहे. वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स (Wardwizard Innovations) असे कंपनीचे नाव आहे.
कंपनीने 2024 च्या मार्च महिन्यात 3500 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. याशिवाय, कंपनीने इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर सेगमेंटमधील विक्रीचे आकडेही जारी केले आहेत. दरम्यान, ही कंपनी जॉय ई बाईक अंतर्गत इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि जॉय ई रिक ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक थ्री व्हीलरचे उत्पादन करते.
कंपनीने मार्चमध्ये इतके युनिट्स विकले
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने मार्चमध्ये Joy-e Bike ब्रँड अंतर्गत एकूण 3801 इलेक्ट्रिक टू-व्हिलर विकल्या. याशिवाय, जॉय-ई रिक ब्रँड अंतर्गत 16 इलेक्ट्रिक तीन चाकी गाड्यांची विक्री झाली. मार्च 2023 च्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत ही 1.5 टक्के वाढ आहे. मार्च 2023 मध्ये कंपनीने 3744 दुचाकी विकल्या होत्या.
शोरुम नेटवर्कचा फायदा
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. कंपनीने सांगितले की, ईव्हीची वाढती मागणी आणि कंपनीचे शोरुम नेटवर्क, यामुळे विक्रीत वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे, कंपनीने या आर्थिक वर्षात 26996 इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री केली आहे. तसेच, या आर्थिक वर्षात कंपनीने 150 हून अधिक शोरुम उघडले आहेत.