गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत वाढ सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल परवडत नाही. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेकांनी ईलेक्ट्रिक वाहन वापरण्यास सुरूवात केली आहे.
इलेक्ट्रिक कार असो किंवा इलेक्ट्रिक स्कूटर, गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील अनेक नामांकित कंपन्यांनी आपले मॉडेल बाजारात आणली आहेत. पण ओला आणि बजाज या दोन कंपन्यांच्या बाईक्स जास्त चालतात.या दोन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात ‘बाज’ची एन्ट्री झाली आहे. फक्त फिचरच नव्हे तर या बाईकची किंमतही या दोन्हीपेक्षा कमी आहे. या बाईकची किंमत फक्त ३५ हजार रुपये असेल, असं कंपनीने म्हटले आहे.
IIT दिल्ली स्थित इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी Baaz Bikes ने EV मार्केटमध्ये दमदार एंट्री केली आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'बाज' लाँच केली आहे. या ई-स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्याच्या स्वॅपिंग प्लॅटफॉर्ममध्ये ९ बॅटरी निश्चित केल्या जाऊ शकतात. त्याची बॅटरी फक्त 90 सेकंदात बदलली जाऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे.
बॅटरी बदलून बॅटरी स्वॅपिंग स्टेशन केल्याने तुम्ही नॉन-स्टॉप प्रवासाचा आनंद घेऊ शकाल, वेगवेगळ्या ऋतूनुसार या स्वॅपिंग स्टेशनची रचना करण्यात आली आहे. पाऊस आणि धुळीसाठी याला ऑल-वेदर IP65 रेटिंग देण्यात आली आहे.
बाज ई-स्कूटरची लांबी १६२४ मिमी, रुंदी ६८० मिमी आणि उंची १०५२ मिमी आहे. याचा टॉप स्पीड २५ किमी प्रतितास देण्यात आला आहे. Baz Bikes ची ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे की-सुसज्ज आहे आणि त्याला परवान्याचीही आवश्यकता नाही. यामुळे आता ग्राहकांना ईलेक्ट्रिक स्कुटरमध्ये नवा पर्याय मिळाला आहे.