Join us

Electric Vehicle Charging Station: फक्त १ लाख रुपये गुंतवा अन् EV चार्जिंग स्टेशन सुरू करा; बंपर कमाईचा राजमार्ग...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 1:46 PM

Electric Vehicle Charging Station : वाढत्या महागाईच्या युगात डिझेल आणि पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. तसंच सीएनजीचे दरही वाढत आहेत.

Electric Vehicle Charging Station : वाढत्या महागाईच्या युगात डिझेल आणि पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. तसंच सीएनजीचे दरही वाढत आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. बाजारात चांगला प्रतिसादही मिळत आहे. यात खर्चही कमी येतो आणि प्रदुषणही होत नाही. यामुळे दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरांसोबतच आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी गाव-खेड्यातही वाढली आहे. याठिकाणी ई-रिक्षा आणि ई-बाईकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय वाढत आहे. तुमच्याकडे फक्त थोडीशी जमीन आणि कमीत कमी १ लाख रुपये गुंतवण्याची तयारी हवी. मग तुम्ही सहजपणे या व्यवसायातून बंपर कमाई करू शकता. 

तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर यासाठी येणारा खर्च तुम्ही वापरणाऱ्या चार्जरच्या क्षमतेवर आहे. यात कमीत कमी १ लाख रुपये खर्च येतो. पण तुम्हाला जर जास्त क्षमतेचा चार्जर बसवायचा असेल तर हाच खर्च ४० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ए.सी.स्लो चार्जर तुलनेनं स्वस्त असतात. तर डी.सी.फास्ट चार्जर महाग असतात. एका डी.सी.चार्जरची किंमत १ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत असते. तर ए.सी.चार्जरची किंमत २० हजार ते ७० हजार रुपयांच्या घरात आहे. फास्ट चार्जरचा वापर करताना फ्ल्युएड-कूल्ड बॅटरी चार्ज करण्यासाठी पीसीएसमध्ये लिक्विड-कूल्ड वायर असणं गरजेचं आहे. 

सरकारकडून परमिट घ्यावं लागणार का?चार्जिंग स्टेशनसाठी कोणत्याही परमिटची आवश्यकता नाही. नव्या नियमांनुसार कोणताही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही परवानगीविना पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारू शकते. यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यात चार्जिंग तंत्र, सुरक्षा आणि परफॉर्मिंग स्टँडर्ड आणि काही प्रोटोकॉलचं पालन करणं इतकीच काळजी घ्यावी लागते. तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर काही जणांना सोबत घेऊन सेल्फ हेल्प ग्रूपच्या माध्यमातून याची सुरुवात करू शकता. सेल्फ हेल्प ग्रूपला बँकेकडून कर्ज दिलं जातं. यातून तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता. 

तुम्हाला फक्त करायचं आहे हे काम...तुम्ही दुचाकी, तीन चाकी, व्यावसायिक, खाजगी, ट्रक किंवा विजेवर चालणाऱ्या बससाठी चार्जिंग स्टेशन बनवू शकता. नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास, दुचाकी, तीनचाकी, व्यावसायिक किंवा खाजगी चारचाकी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बनवण्याचे प्रमाण अधिक आहे. चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी तुम्हाला वीज कनेक्शन घ्यावं लागेल आणि हस्तांतरण देखील करावं लागेल. हस्तांतरणासह जोडण्यासाठी हेवी ड्यूटी केबलिंग काम करावं लागेल. चार्जिंग स्टेशनसाठी जमीन सर्वात महत्त्वाची बाब आहे. तुमची मालकी असेल तर ठीक आहे, नाहीतर भाडेतत्त्वावर मोक्याच्या जागेवर जमीन घेऊ शकता. आता चार्जिंग स्टेशनशी संबंधित शेड, पार्किंग एरिया इत्यादी पायाभूत सुविधा कराव्या लागणार आहेत. मुख्य खर्च चार्जिंग टॉवरच्या उभारणीवर होतो.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार