Join us

पेट्रोल कारपेक्षा स्वस्त होईल इलेक्ट्रीक वाहन,सरकारने GST 18 टक्क्यांवरुन केला 5%

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 3:11 PM

देश आणि विदेशातील पेट्रोलची उपलब्धता आणि इंधन दरावाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत

नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रीकल्स वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. देशातील ईव्ही कारच्या वाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक सुविधा आणि प्रोग्राम लागू केले आहेत. त्यात, केंद्र सरकारने बॅटरी पॅकेजवर जीएसटी 18 टक्क्यांएवजी 5 टक्के एवढा कमी केला आहे. म्हणजेच, ईव्ही कार खरेदी करणाऱ्यांना 13 टक्के जीएसटी बचत होणार आहे. या निर्णयामुळे पेट्रोल कारपेक्षा ईव्ही कारची किंमत कमी होणार असून ग्राहकांना चारचाकी गाडी खरेदी करणे अधिक सुलभ होईल. 

देश आणि विदेशातील पेट्रोलची उपलब्धता आणि इंधन दरावाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, देशपातळीवरही याचा विचार केला जात असून इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादन वाढीसाठी आणि जास्त विक्रीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनी आणि ग्राहकांना दोघांना याचा फायदा होणार आहे. उत्पादन आणि मागणी दोन्हींमध्ये वाढ होण्याच्या उद्देशाने सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात जीएसटी कॉन्सीलद्वारे ईव्हीवरील जीएसटी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादित कंपन्या आणि भारतीय ग्राहकांना या जीएसटी कपात निर्णयाचा लाभ होणार असल्याचंही अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी 2018 मध्ये हा जीएसटी 28 टक्के एवढा होता. त्यावरुन, तो 18 टक्के एवढा करण्यात आला. या निर्णयामुळे भारतात ईव्ही उत्पादक कंपन्यांना भारतात दुकाने सुरू करण्यात सहजता आणि फायदेशीरता उपलब्ध झाली.

टॅग्स :कारइलेक्ट्रिक कारपेट्रोलजीएसटी