Join us

इलेक्ट्रिक वाहने इंधनखर्च वाचविणार- नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:13 AM

पेट्रोल कारच्या देखभालीसाठी महिन्याला सहा हजारांचा खर्च येणार असेल, तर विजेवरच्या कारसाठी हा खर्च केवळ एक हजार इतका असणार आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल कारच्या देखभालीसाठी महिन्याला सहा हजारांचा खर्च येणार असेल, तर विजेवरच्या कारसाठी हा खर्च केवळ एक हजार इतका असणार आहे. या गाड्या इंधनखर्च वाचविणा-या, पर्यावरणपूरक आणि स्वस्त असल्यास लोकांचा कल या गाड्यांकडेच असेल, परंतु देशात लगेचच पेट्रोल कार बंद केल्या जाणार नाहीत किंवा त्यांच्या वापरावर बंदी आणली जाणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.विजेवर चालणा-या गाड्यांमुळे आगामी काळात वाहन उद्योगाच्या एकूण स्वरूपात आमूलाग्र बदल होणार आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या देशातील वाहन उद्योग ४.५ लाख कोटींचा तर वाहनांच्या सुट्या भागांचा १.४५ लाख कोटींचा आहे. निर्बंधांमुळे जुनी वाहने भंगारात निघाल्याने सुटे भाग आणखी स्वस्तात मिळू शकतील. विजेवर चालणाºया वाहनांविषयी व्यापक धोरणाचे काम नीति आयोग तयार करीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ते लवकरच सादर केले जाणार आहे. विजेवर चालणाºया वाहनांच्या अधिकाधिक वापरासाठी जाणीवपूर्वक प्रसार करावा लागेल. या कामासाठी वित्तमंत्रालयाकडे जादा निधीची मागणीही करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. देशाची प्रगती आणि रोजगारनिर्मिती यात वाहन उद्योगाचा खूप मोठा वाटा आहे. या उद्योगाच्या भविष्याचे चित्र नितीन गडकरी यांनी खूप आशादायी वाटते. याबाबत ते म्हणाले की, पर्यायी इंधनावर चालणारी वाहनांमध्ये संशोधन व्हावे, अधिक कल्पकतेचा वापर व्हावा, यासाठी सरकार कायम सहकार्याच्या भूमिकेत असेल. देशातील मोटारींची बाजारपेठ सध्या ३० लाखांच्या घरात आहे. ती २०१५ पर्यंत १ कोटी ३० लाखांहून अधिक असेल. मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाºया या क्षेत्राकडून निर्यातही लक्षणीयरीत्या वाढेल.>नागपुरात लवकरच ई-बाइकपर्यायी इंधनावर चालणाºया वाहनांचा वापर करण्याच्या बाबतीत नागपूर शहराने चांगला पुढाकार घेतला आहे. नागपुरात विजेवर चालणाºया २०० टॅक्सी, २० चार्जिंग स्टेशन्स आहेत. नागपुरात लवकरच विजेवर चालणाºया दुचाकी रस्त्यावर दिसतील. या दुचाकी टॅक्सीप्रमाणे चालविता येतील. साध्या टॅक्सीने जिथे २०० रुपये लागतील, त्याच प्रवासासाठी रिक्षाला १०० रुपये लागतील, पण याच प्रवासासाठी ई-टॅक्सीला केवळ ६० तर इ-बाइकला अवघा १५ रुपये खर्च येईल.

टॅग्स :पेट्रोलपेट्रोल पंप