Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशभरात विजेचे प्रीपेड मीटर सक्तीचे होणार, जितके बॅलेन्स, तितकीच वापरता येईल वीज!

देशभरात विजेचे प्रीपेड मीटर सक्तीचे होणार, जितके बॅलेन्स, तितकीच वापरता येईल वीज!

देशातील वीजग्राहकांना १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले की, मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:07 AM2018-12-25T04:07:16+5:302018-12-25T04:08:03+5:30

देशातील वीजग्राहकांना १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले की, मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल.

Electricity prepaid meters across the country will be compulsory | देशभरात विजेचे प्रीपेड मीटर सक्तीचे होणार, जितके बॅलेन्स, तितकीच वापरता येईल वीज!

देशभरात विजेचे प्रीपेड मीटर सक्तीचे होणार, जितके बॅलेन्स, तितकीच वापरता येईल वीज!

नवी दिल्ली : देशातील वीजग्राहकांना १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले की, मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. त्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वीज वापरता येईल. ती संपताच वीजपुरवठा बंद होईल आणि कार्ड रीचार्ज करताच तो सुरू होईल.

मागेल त्याला वीज योजनेखाली वर्षभरात २.२६ कोटी नव्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. ग्राहकांची संख्या दररोज वाढत आहे. मीटर तपासून, त्यानुसार बिले पाठविणे व वसुली करणे आता वीज कंपन्यांना अवघड होत आहे. बिले विलंबाने गेल्याने वसुलीही वेळेत करता येत नाही. त्यामुळे वीज कंपन्यांचा तोटाही वाढत आहे. त्यातून चुकीची व प्रचंड बिले आल्याच्या तक्रारी येतात.

ऊर्जामंत्री म्हणाले की, यावर ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ हाच उपाय आहे. यामुळे वीज कंपन्यांना ग्राहकांकडून रक्कम आगाऊ स्वरूपात मिळेल. ग्राहक जेवढी रक्कम जमा करेल तेवढीच वीज वापरेल. वीजचोरी व बिले थकबाकीला पायबंद होईल. ग्राहकांसाठीही हे फायद्याचेच आहे.

विनाखंड विजेचा पुरवठा

येत्या १ एप्रिल किंवा त्याआधीही सर्व ग्राहकांना विनाखंड वीज पुरविणे कंपन्यांना सक्तीचे होईल. मध्यंतरी राज्यांनी मागेल त्याला वीज पुरविण्याचे सामंजस्य करार केंद्राशी केले होते. त्याचाच हा भाग आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीत संबंधित राज्याचा वीज नियामक आयोग वीज कंपनीस यात सवलत देऊ शकेल.

Web Title: Electricity prepaid meters across the country will be compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.