मुंबई: जगभरातील एलिवेटर आणि एस्कलेटर बाजारात भारत दुसऱ्या क्रमांकावर असून या व्यवसायातील आजची ११५ अब्जांची उलाढाल पुढच्या तीन वर्षांत १७५ अब्जांचा टप्पा गाठेल, असा विश्वास मद्रास कन्सल्टन्सी ग्रुपचे अध्यक्ष श्री. शंकर गोपालकृष्णन यांच्या यांनी व्यक्त केला. मेस्सी फ्रँकफर्ट आयोजित आयईई एक्स्पो २०१८ ला भरभरून प्रतिसाद मिळाला. फुजीटेक, हिताची, सिटी लिफ्ट्स, एव्हीसीएएम, क्रिस्टा, फेरमाटर, जेफरान, मास इंडस्ट्रीज, मोंटनरी, मोंटेफेर्रो, ओटीस, स्वेचमर्साल या कंपन्यात प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. या ट्रेड फेअरमध्ये सहभागी झालेल्या चीन, जर्मनी, जपान, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, टर्की, युके, अमेरिकेतील १७० कंपन्यांपैकी १० कंपन्यांचे भारतीय बाजारपेठेतील वाढीवर लक्ष आहे.या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्वारस्य वाढत आहे. हे मोठ्या प्रमाणावरील परदेशी सहभागावरून दिसून येतं, याकडे मेस्सी फ्रँकफर्ट ट्रेड फेअर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राज मनेक यांनी लक्ष वेधलं. निवासी आणि व्यावसायिक इमारतींकडून मोठी मागणी येऊ लागली आहे. रेरा कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता येईल आणि त्यामुळे एफडीआयचा मार्गही खुला होईल, असं ते म्हणाले.
एलिवेटर, एस्कलेटर बाजार सुस्साट; २०२१ पर्यंत वार्षिक उलाढाल १७५ अब्जांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 6:33 PM