Join us

Elon Musk : चॅटजीपीटी आणि बार्डला आता मस्क देणार टक्कर, नवी कंपनी केली स्थापन, ‘एआय’मध्ये भडकणार युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 5:50 AM

Elon Musk AI Company: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) चर्चा आहे. या क्षेत्रात आता ट्विटरचे मालक इलाॅन मस्क यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी एक्स.एआय. या नावाने कंपनी स्थापन केली आहे.

टेक्सास : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) चर्चा आहे. या क्षेत्रात आता ट्विटरचे मालक इलाॅन मस्क यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी एक्स.एआय. या नावाने कंपनी स्थापन केली आहे. एआय आणि अत्युच्च क्षमतेच्या काॅम्प्युटिंगसाठी त्यांनी हजाराे ग्राफिक प्राेसेसर आणि सिस्टिम्स खरेदी केल्या आहेत. 

मस्क हे ओपनआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्ड यांना टक्कर देणार आहेत. मस्क यांनी टेक्सास येथे एक्स.एआय या कंपनीची ९ मार्च २०२३ राेजी नाेंदणी केली. नेवादा येथे कंपनीचे मुख्यालय आहे. ते स्वत: कंपनीचे एकमेव लिस्टेड संचालक आहेत. त्यांच्या फॅमिली ऑफिसचे संचालक जेरेड बिर्चेल यांना कंपनीचे सचिव बनविले आहे. कंपनीच्या १० काेटी शेअर्सच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. (वृत्तसंस्था)

ओपनएआयमध्ये मस्क यांनी केली हाेती गुंतवणूकइलाॅन मस्क हे ओपनएआय कंपनीच्या सहसंस्थापकांपैकी एक आहेत. चॅटजीपीटी हे याच कंपनीचे आहे. २०१५ : नाॅन प्राॅफिटेबल कंपनीच्या स्वरूपात कंपनीची सुरुवात झाली हाेती. त्यावेळी मस्क यांनी कंपनीत १० काेटी डाॅलर्सची गुंतवणूक केली हाेती. २०१८ : कंपनीतून बाहेर पडले. अलीकडच्या काळात त्यांनी अनेकदा ओपनएआयवर टीका केलेली आहे

अनेक अभियंत्यांची  केली नियुक्ती मस्क यांनी एआय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच स्पेस एक्स व टेस्लाच्या गुंतवणूकदारांसाेबतही ते नव्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करीत आहेत.एआयच्या क्षेत्रात सध्या चॅटजीपीटीचे वर्चस्व आहे. गेल्यावर्षी ३० नाेव्हेंबरला याची सुरुवात झाली हाेती. महिनाभरातच १० काेटींहून अधिक युझर्सची संख्या झाली हाेती. यावर्षी गुगलनेही बार्ड या एआयची घाेषणा केली. आता मस्क यांचे एक्स.एआय या स्पर्धेत उतरणार आहे.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कव्यवसाय