Join us  

Youtube' चे वर्चस्व संपवण्यासाठी इलॉन मस्कने आखला मोठा प्लॅन! ट्विटरवर आणणार 'हे' फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:26 PM

Twitter लवकरच Youtube ला टक्कर देण्यासाठी नवीन App लाँच करणार आहे.

ट्विटर (Twitter ) आता लवकरच युट्युबला टक्कर देण्यासाठी नवे अॅप लाँच करणार आहे. हे App व्हिडिओ अॅप सारखे काम करणार आहे. याला स्मार्ट टीव्हीवर लाँच केले जाणार आहे. या संदर्भात इलॉन मस्क यांनी माहिती दिली.  एका वापरकर्त्याने ट्विटरवर इलॉन मस्क यांना या संदर्भात प्रश्न केला, स्मार्ट टीव्हीसाठी ट्विटर व्हिडिओ अॅपची आवश्यकता आहे कारण ट्विटरवर एक तासाचे व्हिडिओ पाहण्याची क्षमता नाही. या कमेंटला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे सांगितले.

Share Market विक्रमी पातळीवर पोहोचूनही गुंतवणूकदार नाराजच, Zerodha चे नितीन कामथ म्हणतात...

वापरकर्त्याने त्याच्या उत्तरात म्हटले की, हे विलक्षण आहे! आशा आहे की एक दिवस लवकरच येईल जेव्हा मी YouTube सबक्रिप्शन रद्द करेल आणि ते पाहणे थांबवेल. मात्र, ट्विटरचे व्हिडिओ अॅप येत्या काळात यूट्यूबशी स्पर्धा करण्याची क्षमता असणारे असेल. हे येत्या काही दिवसांतच कळेल.

इलॉन मस्क हे ट्विटर अॅपमध्ये सातत्याने बदल करत आहेत. त्यांनी ट्विटर प्लॅटफॉर्मवर व्हिडिओसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. कॉन्टेट क्रिएटर्स आणि कॉन्टेट पार्टनर्संना मदत करत आहेत. ट्विटर प्लॅटफॉर्मवर ते लवकरच क्रिएटर्संना जाहिरात सेवा सुरू करतील असे आधीच सांगितले आहे. ट्विटर वापरकर्त्यांना यातून उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय, क्रिएटर्स कमेंट बॉक्समध्ये जाहिराती दाखवून उत्पन्न मिळवू शकतील.

२ तासांचा व्हिडिओ पोस्ट करण्यास सक्षम असेल अलीकडे, Twitter ने एक नवीन अपडेट केले आहे जे ब्लू टीक सदस्यांना Twitter वर २-तासांचे व्हिडिओ शेअर करण्यास परवानगी देते. या अपडेटसह, हे व्हिडिओ 8 GB पर्यंत आकारात सक्षम असतील. यासह, वापरकर्त्यांना लांब आणि तपशीलवार व्हिडिओंचा आनंद घेण्याची संधी मिळेल.

टॅग्स :ट्विटरएलन रीव्ह मस्कयु ट्यूब