Join us

Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 3:51 PM

हा जॉब रिमोट स्वरुपाचा आह. आपण दोन दिवसांचे ट्रेनिंग घेतल्यानंतर, घरून काम करू शकता...

इलॉन मस्क यांची AI कंपनी xAI ला AI ट्यूटर्सची आवश्यकता आहे. यांना चांगला मोबदलाही मिळेल. यांना एका तासासाठी 5,000 रुपयांपर्यंत कमावण्याची संधी आहे. हे काम थोडे बहुत टेक्निकल नक्कीच वाटू शकते. मात्र ते सहजपणे समजले जाऊ शकते. आपण एक AI ट्यूटर म्हणून xAI च्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सिस्टिमला योग्य प्रकारे शिकण्यास मदतकराल. आपण त्यांना डेटा आण फीडबॅक द्याल. अशा पद्धतीने आपण एआय अधिक स्रार्ट कराल. या जॉबसाठी आपण LinkedIn वरून अप्लाय करू शकता.

असा असेल जॉब? -जगाला समजणारे AI तया करणे, हे xAI चे मिशन आहे. AI ट्यूटर म्हणून आपले काम AI ला स्पष्ट आणि लेबल केलेला डेटा देणे असेल. ज्याने AI शिकेल. हा डेटा AI सिस्टिमला भाषा व्यवस्थितपणे समजून घेण्यास मदद करेल. सध्या लोक चॅटबॉट्स आणि AI रायटिंग असिस्टन्ट्सचा वापर करतात. AI ट्यूटरला टेक्निकल टीमच्या सोबतीने डेटा एकत्रित करावा लागेल आणि तो ऑर्गेनाइझ करावा लागेल. महत्वाचे म्हणजे, डेटा चांगल्या क्वालिटीचा असावा, हे देखील AI ट्यूटरला निश्चित करावे लागेल.

AI ट्यूटर्सला xAI च्या सॉफ्टवेअरचा वापर करून माहिती वर्गीकृत करावी लागेल. याशिवाय, काही डेटाचा अर्थ काय, हेदेखील आपल्याला AI ला सांगावे लागेल. आपल्याला काही अशा असाइनमेंटदेखील लिहाव्या लागतील, ज्यामुळे AI भाषा समजण्यासाठी अथवा टेक्स्ट प्रोड्यूस करण्यात सोपे जाईल. 

कुणाला करता येईल अप्लाय? -ज्यांना इंग्रजी चांगल्या पद्धतीने लिहिता, वाचता येते. आपल्याला टेक्नॉलॉजीसंदर्भात फारसे ज्ञन असण्याची आवश्यकता नाही. मात्र, आपण लिहिण्याचे, पत्रकारीतेचे काम केले असेल अथवा आपल्याकडे, चागंले रिसर्च स्किल्स असेल तर अधिकच चांगले. याशिवाय, आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसद्वारे माहिती मिळवता यावी आणि तिचे वर्गिकरण करता यावे.

किती मीळेल सॅलरी? -हा जॉब रिमोट स्वरुपाचा आह. आपण दोन दिवसांचे ट्रेनिंग घेतल्यानंतर, घरून काम करू शकता. आपल्याला सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाशी 5:30 वाजेपर्यंत काम करावे लागेल. मात्र, ट्रेनिंगनंतर आपण आपल्या टाइमझोननुसार काम करू शकता. यासाठी आपल्याला दर तासाला 35 ते 65 डॉलर मिळू शकतात (अंदाजे 5,000 रुपये प्रति तास.). याशिवाय, xAI आपल्याला मेडिकल, डेंटल आणि व्हिजन इंश्योरन्स देखील देईल.  

टॅग्स :एलन रीव्ह मस्कव्यवसायनोकरीतंत्रज्ञान