Lokmat Money > बिझनेस न्यूज > एलन मस्क एकटेच मालक नाहीत! ट्विटर खरेदीत सौदी, कतार अन् अब्जाधीशांचा पैसा, बुडाला तरी.... 

एलन मस्क एकटेच मालक नाहीत! ट्विटर खरेदीत सौदी, कतार अन् अब्जाधीशांचा पैसा, बुडाला तरी.... 

एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा ज्या गुंतवणूकदारांना शब्द दिला होता ते दुसरे तिसरे कोणी नाहीत. तर जगातील बड्या बड्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे परंतू जगाच्या अब्जाधीशांच्या यादीतून गायब असणारे राजे रजवाडे आणि उद्योजक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:53 AM2022-11-09T08:53:31+5:302022-11-09T08:54:39+5:30

एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा ज्या गुंतवणूकदारांना शब्द दिला होता ते दुसरे तिसरे कोणी नाहीत. तर जगातील बड्या बड्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे परंतू जगाच्या अब्जाधीशांच्या यादीतून गायब असणारे राजे रजवाडे आणि उद्योजक आहेत.

Elon Musk is not the only owner! This billionaire's money in buying Twitter, even if lost.... | एलन मस्क एकटेच मालक नाहीत! ट्विटर खरेदीत सौदी, कतार अन् अब्जाधीशांचा पैसा, बुडाला तरी.... 

एलन मस्क एकटेच मालक नाहीत! ट्विटर खरेदीत सौदी, कतार अन् अब्जाधीशांचा पैसा, बुडाला तरी.... 

एलन मस्क यांनी ट्विटरला ४२ अब्ज डॉलर्सची ऑफर दिलेली खरी, परंतू त्यांनी काही हा पैसा आपल्या खिशातून दिलेला नाहीय. आज जरी मस्क ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांवर व युजर्सवर दादागिरी करत असले तरी मस्क केवळ नावालाच मालक आहेत. ट्विटरमध्ये सर्वाधीक सौदीच्या राजकुमाराचे देखील पैसे गुंतलेले आहेत. 

एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा ज्या गुंतवणूकदारांना शब्द दिला होता ते दुसरे तिसरे कोणी नाहीत. तर जगातील बड्या बड्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे परंतू जगाच्या अब्जाधीशांच्या यादीतून गायब असणारे राजे रजवाडे आहेत. एलन मस्क यांनी वॉल स्ट्रीट बँकेतून कर्ज काढून आणि गुंतवणूकादारांकडून पैसे घेऊन ट्विटर डील पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. 
मिडल इस्टमधील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे, सौदी अरेबियाचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे मस्कनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यांनी  $1.89 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सौदी अरेबियाच्या सार्वभौम संपत्तीमध्ये या तलाल यांची मालकी 16.9 टक्के एवढी आहे. 

तिसरा नंबर लागतो तो कतार सॉवर्जिअन फंडचा. ट्विटर डीलमध्ये $375 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. द वॉशिंग्टन पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी देखील आपल्याकडील १८ दशलक्ष शेअर्स समोर आणले आहेत. डोर्सी जरी ट्विटरमधून पायऊतार झालेले असले तरी त्यांनी आपली मोठी गुंतवणूक ट्विटरमध्ये ठेवली आहे. डोर्सी यांनी १ अब्ज डॉलर्स ट्विटर डीलमध्ये गुंतविले आहेत. 

क्रिप्टो एक्सचेंज कंपनी Binance ने मस्कच्या Twitter मध्ये $500 दशलक्ष गुंतवणूक केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी चँगपेंग “CZ” झाओ यांची ती कंपनी आहे. या अब्जाधीशांचा पैसा बुडाला तरी त्यांना तेवढा फरक पडणार नाहीय. कारण या लोकांनी अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतविलेले आहेत. 
 

Web Title: Elon Musk is not the only owner! This billionaire's money in buying Twitter, even if lost....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.