टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतलं पहिलं स्थान गमावलं आहे. मस्क यांच्या टेस्लाचे शहर सोमवारी एकाच दिवसात ८.६ टक्क्यांनी गडगडले. त्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत तब्बल १५.२ बिलियन अमेरिकन डॉलरची घट झाली. यामुळे मस्क यांनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीतलं अव्वल स्थान गमावलं.
मस्क है तो मुमकीन है! भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा देण्याची तयारी; इंटरनेट तुफान वेगानं चालणार
सप्टेंबर महिन्यापासून प्रथमच टेस्लाला इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच बिटकॉईन संदर्भात एक ट्विट केलं होतं. बिटकॉईनचं मूल्य वाढलं आहे, असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. टेस्लाच्या ताळेबंदात बिटकॉईनच्या माध्यमातून १.५ बिलियन अमेरिकन डॉलरची भर पडल्याची माहिती टेस्लानं दोन आठवड्यांपूर्वीच दिली होती.
बंगळुरू बनतेय ई-वाहन निर्मितीचे हब; ‘टेस्ला’चे शिक्कामाेर्तब
गेल्या वर्षभरात क्रिप्टोकरन्सीचं मूल्य ४०० टक्क्यांनी वाढलं. मात्र सोमवार, मंगळवारी बिटकॉईनची किंमत घसरली. एकावेळी तर ती ५० हजार अमेरिकन डॉलरच्या खाली आली होती. याचा फटका टेस्लाला बसला आणि मस्क यांच्या संपत्तीत घट झाली. ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार आता मस्क यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य १८३ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. त्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आले आहेत. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा पहिल्या स्थानी आले आहेत. त्यांच्या संपत्तीचं मूल्य १८६.३ बिलियन अमेरिकन डॉलर आहे.
'ते' एक वाक्य अन् एलन मस्कने गमावले १५ अब्ज डॉलर्स; श्रीमंतांच्या यादीतील अव्वल नंबरही गेला!
Elon Musk Loses 15 Billion US dollars: टेस्लाच्या प्रमुखांचं मोठं नुकसान; श्रीमंताच्या यादीतलं पहिलं स्थान गमावलं; जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:32 PM2021-02-23T12:32:52+5:302021-02-23T12:35:54+5:30