Lokmat Money > बिझनेस न्यूज > Elon Musk: इलॉन मस्कच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; आतापर्यंत कोणीही केलेली नाही अशी कामगिरी!

Elon Musk: इलॉन मस्कच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; आतापर्यंत कोणीही केलेली नाही अशी कामगिरी!

Elon Musk: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील इलॉन मस्क यांच्या नावे एका विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:27 PM2023-01-11T12:27:43+5:302023-01-11T12:28:32+5:30

Elon Musk: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील इलॉन मस्क यांच्या नावे एका विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

elon musk made guinness world records of lost 182 billion dollars of personal wealth since 2021 the highest amount of anyone in history | Elon Musk: इलॉन मस्कच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; आतापर्यंत कोणीही केलेली नाही अशी कामगिरी!

Elon Musk: इलॉन मस्कच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; आतापर्यंत कोणीही केलेली नाही अशी कामगिरी!

Elon Musk:टेस्ला आणि स्पेसएक्स्पोचे प्रमुख इलॉन मस्क यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. हा विक्रम नकोशा गोष्टीमुळे नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ट्विटरशी केलेल्या करारानंतर अनेक गोष्टींवरून मस्क यांना ट्रोलही करण्यात आले होते.  मस्कच्या नावे वैयक्तिक सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. मस्क यांचा वैयक्तिकरित्या सर्वाधिक नुकसान सहन करण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.

 दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे सीईओ मस्क गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहेत. गेल्या वर्षी ट्विटर खरेदीचा करार केल्यापासून मस्कच्या एकूण संपत्तीत सातत्याने घट झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने याबाबत ट्विट करत माहिती दिली. इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्तेचे सर्वात मोठे नुकसान सहन करण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम केला आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये, संस्थेने फोर्ब्सच्या अंदाजाचा हवाला देत मस्क यांनी नोव्हेंबर २०२१ पासून सुमारे १८२ बिलियन डॉलर गमावले आहेत. परंतु इतर स्त्रोतांनी हा आकडा २०० बिलियन डॉलरच्या जवळ असल्याचे म्हटले आहे. 

एलन मस्कच्या नुकसानीचा अचूक आकडा निश्चित करणे अशक्य

एलन मस्कच्या नुकसानीचा अचूक आकडा निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे, परंतु मस्कच्या एकूण तोट्याने २००० मध्ये जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोनच्या ५८.६ बिलियन डॉलरच्या नुकसानीच्या मागील रेकॉर्डला मागे टाकले आहे, असे जीडब्ल्यूआरच्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये एलन मस्कची एकूण संपत्ती ३२० अब्ज डॉलरवरून ६ जानेवारी २०२३ पर्यंत १३७ बिलियन डॉलरवर घसरली आहे, यामध्ये मुख्यत्वे टेस्लाच्या स्टॉकची खराब कामगिरी कारणीभूत ठरली आहे, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, मस्कने गेल्या वर्षभरात सुमारे २०० अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली असून एखाद्या व्यक्तीने इतके मोठे नुकसान सहन करण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली आहे. संपत्तीत घट झाल्याने एलन मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जाही गमावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: elon musk made guinness world records of lost 182 billion dollars of personal wealth since 2021 the highest amount of anyone in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.