न्यूयॉर्क: अनेक महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर इलॉन मस्क ट्विटर विकत घेण्यासाठी ४४४ अब्ज डॉलरचा करार करणार असल्याचे वृत्त धडकताच कंपनीच्या शेअरने अचानक उसळी घेतली. अप्पर सर्किट लागल्यामुळे काही काळ या कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेडिंग थांबविण्यात आली होती.
विश्वसनीय सूत्रांच्या आधारे ब्लूमबर्गने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मस्क यांनी सॅन फ्रान्सिस्को कंपनीचे प्रति समभाग ५४.२० डॉलरला खरेदी करण्याची ऑफर दिल्यामुळे ट्रेडिंग थांबण्यापूर्वी शेअर्स जवळजवळ १३ टक्के वाढून ४७.९५ डॉलरवर गेला. वृत्तानुसार, मस्क यांनी ट्विटरला पत्र पाठवून हा करार पूर्ण करण्याची ऑफर दिली असून त्यास भागधारकांची आधीपासून मान्यता आहे.
दरम्यान, मस्क यांना मूळ किंमतीवर ट्विटर विकत घेण्यास भाग पाडावे, यासंदर्भातील खटल्याची सुनावणी या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे. ट्विटर खरेदी संदर्भातील डीलचा वाद न्यायालयात गेल्याने भागधारक नाराज झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"