Join us  

Elon Musk on Twitter: "Twitter खरेदी केल्यानंतर बोर्ड मेंबर्सची हकालपट्टी करणार", एलन मस्क यांची कंपनीला नवीन ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:38 PM

Elon Musk on Twitter: “ट्विटर माझ्या मालकीची झाली, तर कंपनीची दरवर्षी 30 लाख डॉलरची बचत करुन देईन.”

Elon Musk on Twitter: अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) खरेदी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क(Elon Musk) यांनी ट्विटरबाबत अजून एक चकीत करणारे वक्तव्य केले आहे. कंपनीची मालकी हातात आल्यास बोर्ड बरखास्त करणार असल्याचे वक्तव्य मस्क यांनी केले आहे. इन्वेस्टमेंट एडवायजर गॅरी ब्लॅकच्या एका ट्वीटला उत्तर देताना त्यांनी हे म्हटले आहे.

ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर असलेले एलन मस्क म्हणाले की, जर त्यांना ट्विटरची संपूर्ण मालकी मिळाली, तर ते दरवर्षी कंपनीचे 30 लाख डॉलर वाचवतील. मस्कने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “ट्विटर माझ्या मालकीची झाली, तर बोर्ड मेंबर्सची पगार 0 डॉलर असेल. यातून कंपनीची दरवर्षी 30 लाख डॉलरची बचत होईल.”

गॅरी ब्लॅकने याय ट्वीट केले होते?इन्वेस्टमेंट एडवायजर गॅरी ब्लॅकने आपल्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या बोर्डावर निशाना साधला होता. ते म्हणाले होते की, "बोर्डाचे सदस्य शेयरहोल्डर्सच्या बाजूने नाहीत. बोर्डाचे काम शेयरहोल्डर्सचे प्रतिनिधित्व करणे आहे. जर ते शेयरहोल्डर्सच्या हिताची कामे करणे बंद करणार असतील, तर त्यांना हटवून नवीन मेंबर्सना आणावे.”

गॅरी ब्लॅकने आपल्या ट्वीटमध्ये हेदीखील म्हटले की, "जर एलन मस्क यांनी ट्विटरला खासगी कंपनी बनवले, तर बोर्ड मेंबर्सची गरज नाही. यामुळे दरवर्षी कंपनीचे 25-30 लाख डॉलर वाचतील." दुसऱ्या एका ट्विटमध्ये गॅरीने लिहीले की, "एलन मस्क आणि कंपनीचे फाउंडर जॅक डोर्सी यांना सोडून इथर 12 शेयरहोल्डर्सकडे फक्त 77 शेयर्स आहेत. म्हणजेच, कंपनीच्या बोर्ड मेंबर्सकडे कोणतेही शेअर्स नाहीत. त्यामुळेच ते शेअर्सहोल्डर्सच्या बाजूने विचार करत नाहीत." 

टॅग्स :ट्विटरएलन रीव्ह मस्क