आज आपण ज्या अभिमानाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कचे(Elon Musk) नाव घेतो आणि त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहतो, त्यांची एके काळी फारच हलाकीची परिस्थिती होती. आपले जुने दिवस शेअर करताना एलोन मस्क यांनी सांगितले की, अमेरिकेत ते पहिल्यांदा आले होते, तेव्हा त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता.
जगातील ऑटोमोटिव्ह उद्योगाला इलेक्ट्रिककडे वळवण्याच्या भूमिकेचे कौतुक करत, एलोन मस्क यांना टाईम मासिकाने "पर्सन ऑफ द इयर" म्हणून घोषित केले आहे. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना एलोन मस्क यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली.
पार्ट टाइम काम करुन पूर्ण केले शिक्षण
जेव्हा एलोन मस्कने जेफ बेझोसला मागे टाकून या वर्षाच्या सुरुवातीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता, तेव्हा त्यांनी अमेरिकेतील त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवले. मस्क यांनी ट्विट केले होते की, "अमेरिकेत पहिल्यांदा आलो, तेव्हा माझ्याकडे एक पैसाही नव्हता. शिष्यवृत्ती आणि पार्ट टाइम काम करुनही माझ्यावर $100 पेक्षा जास्तीचे कर्ज होते. अभ्यासासाठी शाळेत नोकरीही करावी लागली होती.
फायनान्शिअल टाईम्स इलॉन मस्कबद्दल लिहितात, “पुढच्या वर्षी टेस्ला कोसळली तरी, मस्क कदाचित जगातील सर्वात महत्त्वाच्या उद्योगांपैकी एक अशा प्रकारे बदलून टाकेल, ज्यामुळे सरकार, गुंतवणूकदार आणि हवामान बदलांना मदत होईल.” याचा खोल परिणाम होऊ शकतो.
76,000 कोटी कर
टाइम मॅगझिनने इलॉन मस्क यांना 'पर्सन ऑफ द इयर' घोषित केल्यानंतर त्यांचा कठीण टप्पा सुरू झाला आहे. यूएस सिनेट सदस्य एलिझाबेथ वॉरन यांनी ट्विटरवर एलोन मस्क यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप केला. त्याला पर्सन ऑफ द इयर ऐवजी टॅक्स रिगर म्हंटले पाहिजे, असे वॉरन म्हणाले. यानंतर वॉरन आणि इलॉन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यानंतर मस्क म्हणाले की या वर्षी तो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक करदाता बनणार आहे. अमेरिकेची वृत्तसंस्था ब्लूमबर्गने अंदाज व्यक्त केला आहे की, या वर्षी त्यांना 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 76 हजार कोटींचा कर भरावा लागेल. असे झाल्यास ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त कर भरणारे ठरतील.