Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tesla चे ५० कर्मचारी चालवणार Twitter ची गाडी, मस्क देणार मोठी जबाबदारी

Tesla चे ५० कर्मचारी चालवणार Twitter ची गाडी, मस्क देणार मोठी जबाबदारी

मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर त्यांनी धडाधड अनेक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 11:22 AM2022-11-02T11:22:14+5:302022-11-02T11:22:56+5:30

मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर त्यांनी धडाधड अनेक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.

elon musk pulls 50 tesla employees into twitter says report new decision | Tesla चे ५० कर्मचारी चालवणार Twitter ची गाडी, मस्क देणार मोठी जबाबदारी

Tesla चे ५० कर्मचारी चालवणार Twitter ची गाडी, मस्क देणार मोठी जबाबदारी

इलॉन मस्क यांच्याकडे आता ट्विटरची नवी मालकी आली आहे. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर त्यांनी धडाधड अनेक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. यांनी या मायक्रोब्लॉगिंग साइटवर मोठ्या पदावर 50 नवीन लोकांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांनी इलॉन मस्क यांच्यासोबत कार निर्माता कंपनी टेस्लामध्ये काम केलं आहे आणि ते त्यांचे निकटवर्तीयही मानले जातात. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे.

मस्क हे टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपन्यांचे सीईओ आहेत. नुकतंच त्यांनी 44 बिलियन डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी करत मालकी आपल्याकडे घेतली. 28 ऑक्टोबरला हे अधिग्रहण पूर्ण झाले. ट्विटरची धुरा स्वीकारताच मस्क यांनी सीईओ, सीएफओ आणि पॉलिसी लीगल टीमला बाहेरचा रस्ता दाखवला.

सीएनबीसीनं दिलेल्या माहितीनुसार मस्क यांच्या अन्य कंपन्यांतील कर्मचारीही ट्विटरमध्ये काम करणार आहेत. यामधील 50 जण हे टेस्लामधून घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आणखी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

हे करणार काम
मस्क यांनी अनेकांना आपल्यासोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डायरेक्टर ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एलसवामी, डायरेक्टर ऑफ ऑटो पायलट अँड टेस्ला बोट इंजिनिअरिंग मिलन कोवाक, सीनिअर डायरेक्टर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग महाविरदुहागिरी, सीनिअर स्टाफ टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर पेटे आणि टेस्ला सर्विलिअन्स युनिटचा भाग असलेले कॅन नेसकॉन यांचा समावेश असेल.

 

Web Title: elon musk pulls 50 tesla employees into twitter says report new decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.