Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tesla च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, १४ हजार जणांना काढणार? कारण काय?

Tesla च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, १४ हजार जणांना काढणार? कारण काय?

टेस्लाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ड्रू बग्लिनो यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:36 AM2024-04-17T10:36:21+5:302024-04-17T10:36:40+5:30

टेस्लाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ड्रू बग्लिनो यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Elon Musk s Tesla to lay off more than 14000 of staff globally to save costs know details india tour | Tesla च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, १४ हजार जणांना काढणार? कारण काय?

Tesla च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, १४ हजार जणांना काढणार? कारण काय?

इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादक कंपनी ‘टेस्ला’ने कर्मचारी कपातीची मोठी योजना बनविली असून, जगभरातील विविध प्रकल्पांतील १० टक्के म्हणजेच सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांना कंपनी नोकरीवरून काढणार आहे. टेस्लाच्या विक्रीत अलीकडे घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी कपात करण्यात येत आहे.
 

मस्क यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आपण कंपनीला विकासाच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जात आहोत. त्यासाठी खर्चात कपात आवश्यक आहे. गंभीर विनिमयानंतर १० टक्के कर्मचारी कपात करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. 
 

उपाध्यक्षांचा राजीनामा 
 

टेस्लाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ड्रू बग्लिनो यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ड्रू बग्लिनो हे कंपनीच्या बॅटरी, मोटारी व ऊर्जा उत्पादनांसाठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विकास विभागाचे प्रमुख होते. त्यांच्याकडे १८ वर्षांचा अनुभव आहे. ते मस्क यांच्या जवळचे अधिकारी समजले जात.

Web Title: Elon Musk s Tesla to lay off more than 14000 of staff globally to save costs know details india tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.