Elon Must On X: इलॉन मस्क यांनी यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स विकत घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी त्याचं नाव बदलून 'X' असं केलं. त्यानंतर त्यांनी त्यात अनेक बदल केले. परंतु आता पुन्हा एकदा मस्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची चर्चा आहे. मस्क यांची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी एक्सएआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स विकत घेतला असल्याची माहिती मस्क यांनी शुक्रवारी दिली. हे अधिग्रहण ऑल-स्टॉक ट्रान्झॅक्शन म्हणून करण्यात आलं आहे. हा करार ३३ अब्ज डॉलरचा आहे. तसंच १२ अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. ज्यामुळे एकूण एक्सचे मूल्यांकन ४५ अब्ज डॉलर्स झालंय. मस्क यांची एआय कंपनी सध्या जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू आहे. अशा तऱ्हेनं या अधिग्रहणानंतर त्याच्याकडे मोठा डेटा असेल जो रिअल टाइममध्ये येईल.
या करारावर एलन मस्क काय म्हणाले?
इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भातील माहिती दिली. "एक्सएआयनं एक्स विकत घेतलं आहे. एक्सएआय दोन वर्षांपूर्वी स्थापनेपासून वेगानं काम करत आहे. सध्या त्यांनी आघाडीची एआय लॅब तयार केली आहे. तर, एक्सचे ६०० मिलियनहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. गेल्या दोन वर्षांत ही कंपनी जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक बनली आहे. दोन्ही कंपन्या मिळून कोट्यवधी लोकांना स्मार्ट आणि अर्थपूर्ण अनुभव देऊ शकतील. या पावलाद्वारे आपण जगात काय घडत आहे हे दाखवू शकूच, शिवाय माणसाची अधिक प्रगतीही करू शकू," असं मस्क यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून म्हटलंय.
कमाई करायची असेल तर समजून घ्या गणित; ज्वेलरी की Gold ETF, कुठे मिळू शकतो बंपर रिटर्न?
"एक्सएआय आणि एक्सचं भवितव्य एकमेकांशी जोडलेलं आहे. आज, आम्ही अधिकृतपणे डेटा, मॉड्यूल, कम्प्युट, डिस्ट्रिब्युशन आणि टॅलेंट एकत्र करीत आहोत. हे अधिग्रहण अशा वेळी झाले आहे जेव्हा एआय स्पर्धा वाढत आहे," असं त्यांनी नमूद केलं. xAI २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता. एआय चॅटबॉट ग्रोकच्या रूपात लोकांमध्ये आला. हा चॅटबॉट रिअलटाइम रिस्पॉन्स देतो.
दोन्ही कंपन्यांनी निधी उभारला
नुकताच दोन्ही कंपन्यांनी निधी उभारला आहे. एक्सनं गेल्या वर्षी ४४ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनानं १ अब्ज डॉलरचा निधी उभारला होता. त्याचवेळी एक्सएआयनं ब्लॅकरॉक, फिडेलिटी, मॉर्गन स्टॅनली, सिकोइया कॅपिटल, एनव्हिडिया आणि एएमडी कडून ४५ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर निधी उभारला होता. रिपोर्टनुसार, एक्सएआय लवकरच ७५ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर पुढील फंड राउंड सुरू करू शकते.