Join us

एलॉन मस्क घेतात 'श्रीरामांचा' सल्ला, ट्विटरच्या मालकांचा पडद्यामागील सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 1:56 PM

भारतीय वंशाचे नागरिक श्रीराम कृष्णनन यांच्या सल्ल्यानेच एलॉन मस्क मोठेृ-मोठे निर्णय घेत आहेत

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्क याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण, लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आता पूर्णपणे इलॉन मस्क यांच्या मालकीची झाली आहे. ट्विटरची मालकी मिळताच मस्क यांनी पराग अग्रवाल यांना कंपनीच्या सीईओ पदावरून हटवले. त्यामुळे, भारतातही मस्क हे चांगलेच चर्चेत आले होते. एका भारतीय नागरिकाला कंपनीच्या पदावरुन हटवलं असलं तरी त्यांच्या अनेक बड्या निर्णयामागेही एक भारतीय वंशांचे नागरिकच असल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतीय वंशाचे नागरिक श्रीराम कृष्णनन यांच्या सल्ल्यानेच एलॉन मस्क मोठेृ-मोठे निर्णय घेत आहेत. Twitter मध्ये अलीकडच्या काळात जे बदल किंवा निर्णय होत आहेत, त्यामध्येही श्रीराम कृष्णन हे पडद्यामागची भूमिका निभावत असल्याचे बोलले जाते. 

श्रीराम कृष्णन यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रीराम हे (A16z) म्हणजेच Andreessen Horowitz कंपनीचे जनरल मॅनेजर आहेत. श्रीराम यांच्याजवळ बिट्स्की, होपिन आणि पॉलीवर्क कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डमध्ये काम करण्याचाही अनुभव आहे. तसेच, अनेक कंपन्यांमध्ये वरिष्ठ प्रोडक्टची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्म मधील अनुभवाचा विचार केल्यास श्रीराम यांच्याजवळ स्नॅप (Snap) आणि फेसबुक (Facebook) मध्ये मोबाइल जाहीरात प्रोडक्टची जबाबदारी होती. 

श्रीराम कृष्णनन यांचा जन्म चेन्नईत झाला होता. त्यांनी 2001 ते 2005 या कालावधीत अन्ना यूनिवर्सिटीच्या एसआरएम इंजीनियरिंग कॉलेजमधून इन्फॉर्मेंशन टेक्नॉलॉजीत बॅचलर डिग्री घेतली आहे. त्यानंतर, 2007 मध्ये माइक्रोसॉफ्टमध्ये व्हिजुअल स्टूडियोचे ते प्रोग्राम मॅनेजर बनले. तर, फेसबुक मध्ये श्रीराम यांनी फेसबुक ऑडियंस नेटवर्क बनविले, ज्याची स्पर्धा गूगल अॅड टेक्नॉलॉजीसोबत होती. तसेच, स्नॅप मध्ये कंपनीचा अॅड टेक प्लेटफॉर्म बनविला. त्यानंतर, त्यांनी ट्विटर जॉईन केले, जेथे ते सीनियर डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. 

लवकरच ट्विटरवर मोठा बदल, नवं फिचर

ट्विटरवर एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. तो एक फिचर म्हणून करण्यात आला आहे. डाऊनवोट असं या फिचरचं नाव आहे. जेव्हा तुम्ही ट्विट करता तेव्हा अनेकदा लोक त्यावर काही आक्षेपार्ह अपमानास्पद टिप्पण्या करतात. त्यामुळे अनेक युझर्सनां अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे नवे डाऊनवोट फिचर आणण्यात आले आहे. तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचं ट्विट न आवडल्यास तुम्ही डाऊनवोट करू शकता. हे फिचर पोस्टच्या रिप्लायसाठी मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे, ते कुणाचाही अवमान करणार नाही. तसेच कुणालाही आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याची परवानगी देणार नाही. 

टॅग्स :ट्विटरएलन रीव्ह मस्कव्यवसायफेसबुक