Join us

Elon Musk : Tesla ला ₹१२४५ कोटींचा दंड, 'या' प्रकरणी न्यायालयानं दिला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 1:39 PM

इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला अमेरिकन कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे.

इलॉन मस्क यांची (Elon Musk) इलेक्ट्रिक वाहन (EV) कंपनी टेस्लाला (Tesla) अमेरिकन कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. कॅलिफोर्नियाच्या एका न्यायाधीशांनी शुक्रवारी टेस्लाला दिवाणी खटल्याच्या निकालाचा भाग म्हणून १५ लाख डॉलर्स (१२४५ कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले. हा दंड टेस्लाला एका प्रकरणात लावण्यात आला आहे, ज्यामध्ये कंपनीने आपल्या कार सर्व्हिस सेंटर, एनर्जी सेंटर आणि कारखान्यातील घातक कचरा योग्यरित्या हाताळला नाही असा आरोप करण्यात आला आहे. "इलेक्ट्रिक वाहनं पर्यावरणाचं रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु त्यांची निर्मिती आणि देखभाल यामुळे घातक कचरा निर्माण होतो हे ओळखणं महत्त्वाचं आहे," असं डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रॉन फ्रीटास म्हणाले. 

तपासात केलेलं सहकार्य  

या प्रकरणात सहभागी असलेल्या काही अॅटर्नी ऑफिसांपैकी काहींच्या निवेदनानुसार, सॅन जोक्विन काउंटीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. घातक कचऱ्याची चुकीच्या पद्घतीनं विल्हेवाट लावणं आणि कचरा साठवणूक, तसंच व्यवस्थापनाशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या वक्तव्यानुसार, टेस्लानं तपासात सहकार्य केले आणि कायद्यांच्या पालनाशी निगडीत सुधारणांसाठी काम केलं. 

कॅलिफोर्नियात कंपनी 

टेस्लाची कॅलिफोर्नियामध्ये सुमारे ५७ कार सर्व्हिस सेंटरआणि १८ एनर्जी फॅसिलिटीज आहेत. हे सॅन फ्रान्सिस्को बे एरियातील फ्रेमोंट शहरात इलेक्ट्रिक वाहनं तयार करते. टेस्लाच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाले तर इलॉन मस्क यांचा त्यात २०.६ टक्के हिस्सा आहे. त्यानंतर झॅचरी किर्खोर्न यांच्याकडे ०.०८ टक्के हिस्सा आहे. टेस्लाच्या २०२२ च्या वार्षिक अहवालानुसार, त्याचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क यांच्याकडे ७१.५ कोटी शेअर्स आहेत.

टॅग्स :टेस्लाएलन रीव्ह मस्क