BYD vs Tesla : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ इलॉन मस्त सध्या चिंतेत आहेत. एकीकडे ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकन लोकांचा रोष पाहायला मिळतोय. लोक विशेष करुन टेस्ला शोअरुमच्या बाहेर आंदोलन करत आहेत. एकेठिकाणी टेस्लाचे शोरुमही जाळण्यात आलं. अमेरिकन लोक टेस्ला बायकॉटची मोहीम चालवत आहेत. तर दुसरीकडे चिनी कंपनी बीवायडीची (BYD) इलेक्ट्रीक कार टेस्लाला चांगली स्पर्धा देत आहेत. अमेरिकत ही कार लोकप्रिय होत असून याचा फटका टेस्लाला बसत आहे. अशा तिहेरी संकटात इलॉन मस्क यांची ड्रीम कार अडकली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मस्क यांनी आता टाटासह ३ कंपन्यांकडे मदतीची मागणी केली आहे.
चिनी कंपनी अमेरिकेतील बाजारपेठ काबिज करत असतानाच मस्क यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा झाली असून लवकरच टेस्ला कार भारतीय रस्त्यावर धावताना पाहायला मिळतील. यासाठी टेस्ला ३ भारतीय कंपन्यांशी भागिदारी करणार आहे. टेस्ला अमेरिकन मेमरी चिप निर्माता कंपनी मायक्रोन आणि मुंबईस्थित सीजी सेमी (मुरुगप्पा ग्रुपचा भाग) यांच्याशी चर्चा करत आहे. टेस्लाने टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत केलेल्या धोरणात्मक करारानंतर हे पाऊल उचलले आहे, ज्या अंतर्गत टेस्ला तिच्या जागतिक उत्पादनासाठी सेमीकंडक्टर चिप्स खरेदी करेल. टेस्लाने मायक्रोन, सीजी सेमी आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स या ३ प्रमुख सेमीकंडक्टर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
गेम चेंजर ठरतील या कंपन्या?टेस्ला ज्या कंपन्यांशी चर्चा करत आहे त्यापैकी, मायक्रोन त्यांच्या गुजरात युनिटमधून असेंब्ली आणि चाचणी उत्पादन सुधारेल. यामुळे कंपनीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, सीजी सेमीचे युनिट आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (OSAT) वर लक्ष केंद्रित करेल. हा संयुक्त उपक्रम सीजी पॉवर, रेनेसास आणि स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स यांच्यात आहे, ज्यामध्ये रेनेसास हा प्रमुख ग्राहक आहे. परंतु, इतर जागतिक ग्राहकांना देखील सेवा देतात.
टेस्लाची गरज काय आहे?टेस्लाला त्यांची वाहने तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्सची आवश्यकता असते. यामध्ये, ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल्स) २८-६५ एनएम नोड्स आणि इतर पॅकेजिंग आर्किटेक्चर्सबाबत चर्चा सुरू आहे. टेस्लाची २८-६५ नॅनोमीटर नोड उत्पादने दरवर्षी १०% पेक्षा जास्त दराने वाढवण्याची योजना आहे. नोड पॅकेजिंग सुविधेसाठी मायक्रोन एटीएमपी, टाटा ओएसएटी आणि सीजी सेमी ओएसएटी सोबत चर्चा सुरू आहे.
वाचा - भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
चीनच्या कंपनीचा अमेरिकेत दबदबाचीनच्या ई-वाहन निर्माता कंपनी BYD ने टेस्लाचं वर्चस्व संपवलं आहे. बीवायडीने टेस्लाला मागे टाकत जगातील नंबर वन ई-कार कंपनी बनली आहे. गेल्या वर्षी टेस्लाचा एकूण महसूल १५५.५ अब्ज डॉलर होता, तर बीवायडीने १७० अब्ज डॉलर महसूल कमावला आहे. बीवायडी १०० अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनात टेस्लाच्या पुढे आहे, ज्याचे बाजार मूल्य ९७.७ अब्ज डॉलर्स आहे.