Join us  

Elon Musk च्या मनात नेमकं काय? मँचेस्टर युनायटेची खरेदी अन् रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक पक्षांना पाठिंबा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 2:00 PM

मस्कच्या मनात नेमकं चाललंय काय?

ट्विटर कंपनीच्या खरेदीची डील रद्द झाल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (elon musk) आता फुटबॉल संघ विकत घेण्याची योजना आखत आहेत का, असा प्रश्न त्यांच्या एका ट्विटमुळे अनेकांना पडलाय. याबद्दल ट्विट करत संघ विकत घेणार असल्याची घोषणाही त्यांनी ट्विटरवरून केली आहे. यात ट्विटमध्ये माहिती दिली आहे की, मस्क लवकरच लोकप्रिय फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेणार आहे (cristiano ronaldo manchester united). प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो हा या क्लबमधूनच खेळतो. या घोषणेने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काही लोक याला विनोद म्हणत आहेत, तर काहींनी मस्कचे अभिनंदन केलंय.

Elon Musk च्या या ट्विटमुळे सोशल मीडियात खळबळ-मस्क यापूर्वीही आपल्या मजेशीर ट्विटमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या ट्विटपूर्वी त्यांनी राजकारणाशी संबंधित ट्विट केले होते. यामध्ये मस्क यांनी लिहिले होते की, अमेरिकेत मी अर्ध्या रिपब्लिकन पक्षाला आणि अर्ध्या डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देतो. यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले, 'हो, मी मँचेस्टर युनायटेडला विकत घेणार आहे. वेलकम!'

याशिवाय मस्कने ट्विटमध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे काही लोक याला एक मजेदार ट्विट देखील मानत आहेत. तर काही लोकांना ते खरोखरच खरे वाटत आहे.

सध्या मँचेस्टर युनायटेडचा मालक कोण आहे?मँचेस्टर युनायटेड फुटबॉल जगतातील सर्वात प्रसिद्ध क्लबपैकी एक आहे. सध्या या क्लबची मालकी अमेरिकेतील ग्लेसर कुटुंबाकडे आहे. या फुटबॉल क्लबची किंमत 2.08 अब्ज डॉलरपर्यंत आहे. ग्लेसर कुटुंबाने हा क्लब 2005 मध्ये 86 दशलक्ष डॉलरला विकत घेतला होता. अनेक प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू या क्लबशी जोडले गेले आहेत. रोनाल्डोही या क्लबकडून खेळतो

टॅग्स :पुणेपिंपरी-चिंचवडगुन्हेगारीएलन रीव्ह मस्कअमेरिकाट्विटरफुटबॉलख्रिस्तियानो रोनाल्डो