Elon Musk X: YouTube प्रमाणे, X (पूर्वीचे Twitter) ने देखील युजरला कमाईसाठी एक उत्तम व्यासपीठ दिले आहे. X मॉनिटायझेशन फीचरद्वारे X युजर मोठी कमाई करू शकतात. ही सुविधा नुकतीच सुरू झाली असून लोकांनाही ती खूप आवडली आहे. दरम्यान, इलॉन मस्क यांनी X ला विश्वासार्य प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
Making a slight change to creator monetization:
— Elon Musk (@elonmusk) October 29, 2023
Any posts that are corrected by @CommunityNotes become ineligible for revenue share.
The idea is to maximize the incentive for accuracy over sensationalism.
इलॉन मस्क X मधून मिळणारे उत्पन्न पात्र युजरसोबत शेअर करतात. क्रिएटर मोनिटायझेशन, असे या फीचरचे नाव आहे, ज्या अंतर्गत युजरला पैसा मिळतो. यातून अनेक लोकांनी चांगली कमाई केली आहे. पण, युजरच्या पोस्ट कम्यूनिटी नोट्सद्वारे चेक झालेल्या असतील, तर युजरला पैसे मिळणार नाहीत. कम्यूनिटी नोट्स, हा एक फॅक्ट चेक प्रोग्राम आहे.
नवीन नियम अशा प्रकारे काम करेल
जर तुम्हीदेखील एक्सवरुन कमाई करत असाल, तर हा नियम तुमच्यासाठी महत्वाचा आहे. समजा तुम्ही काहीतरी पोस्ट केले, पण त्यातील काही तथ्य चुकीचे आहेत. कम्यूनिटी नोट्स तुमच्या पोस्टमधील फॅक्ट्स दुरुस्त करेल. असे झाल्यास तुम्हाला या पोस्टमधून मिळणारे उत्पन्न मिळणार नाही. मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, कम्युनिटी पोस्टद्वारे दुरुस्त केलेल्या पोस्टसाठी कोणतेही पैसे दिले जाणार नाहीत. हा नवीन नियम X वरील खोट्या बातम्या आणि खोट्या पोस्टला आळा घालण्यास मदत करू शकतो.