Maye Musk: टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्याने चर्चेत असतात. मात्र, त्यांची आई मेय मस्क यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. ७० वर्षीय मेय मस्क सोशल मीडियावर प्रसिद्ध असून त्या आजही मॉडेलिंग करतात. अलीकडे त्यांचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेलं उत्तर. इलॉन मस्क यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले की ते या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देणार आहेत. यानंतर ही सर्व चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान मोदींचा मस्क यांना प्रतिसाद
इलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. "मी इलॉन मस्कशी बोललो आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यात या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांचा समावेश आहे," असे त्यांनी लिहिले.
— Maye Musk (@mayemusk) April 19, 2025
मस्क यांच्या आईचे पंतप्रधान मोदींना ट्विट
पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर, इलॉन मस्क यांची आई मेय मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर दिले. मेय मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शब्द नाही तर २ इमोजींचा वापर करुन पंतप्रधानांना उत्तर दिले आहे. त्यांनी एक इमोजीत तिरंग्याचा वापर केला आहे तर दुसरा इमोजी हसऱ्या चेहऱ्याचा आहे. मेय मस्क यांनी ट्विट केलेले हे इमोजी त्यांचे भारतावरील प्रेम दर्शवतात.
वाचा - 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात..
७० व्या वर्षात मेय मस्क यांची मॉडेलिंग
मेय मस्क ७० वर्षांच्या असून व्यवसायाने मॉडेल आहेत. ७० वर्षांच्या वयातही, मेय मस्क खूप सुंदर दिसतात. त्या अजूनही मॉडेलिंग करत आहेत. मोटिवेशनल स्पीकर म्हणून मेय मस्क जगभर व्याख्यान देत असतात. मेय मस्क यांनी वयाच्या १५ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. फॅशन इंडस्ट्रीमध्ये मेय मस्क यांना खूप मागणी आहे. मेय मस्क यांचे पती आणि इलॉन मस्क यांचे वडील इरॉल यांच्यापासून घटस्फोट झाला आहे.