Join us

Elon Musk Satellite Internet: एलॉन मस्क यांची कंपनी भारतात एन्ट्री घेण्यास तयार, Jio, Vi सोबत होऊ शकतं डील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 7:22 PM

Elon Musk Satellite Internet: एलॉन मस्क स्टारलिंक प्रोजेक्ट्सद्वारे भारतात लवकरच इंटरनेट सेवा सुरू करण्याची शक्यता. ५ हजारांपेक्षा अधिक प्री-बुकिंग.

Elon Musk Satellite Internet: जगातिल सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) लवकरच भारतात स्टारलिंक (Starlink) द्वारे इंटरनेट सेवा क्षेत्रात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनी सध्या भागीदाराच्या शोधात असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या भारतीय कंपन्यांची यावर नजर आहे त्यामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea), भारत नेट (BharatNet) आणि Raitel यांचा समावेश आहे. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची (SpeceX) सॅटेलाईट ब्रॉडबँड कंपनी स्टारलिंक (Starlink) ग्रामीण क्षेत्राकील ब्रॉडबँड सेवांवर आपलं लक्ष केंद्रीत करू शकते.

नीति आयोगाद्वारे पहिल्या टप्प्याअंतर्गत १२ जिल्ह्यांची ओळख पटवल्यावर ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांसोबत चर्चा सुरू केली जाईल. आम्ही काही कंपन्या आणि युनिव्हर्सलव सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाच्या (Universal Service Obligation Fund - USOF) आवडीचा स्तर पाहणार आहोत, अशी प्रतिक्रिया भारतातील SpaceX ची सहयोगी कंपनी स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव (Sanjay Bhargava) यांनी दिली. आम्ही निश्चित कालावधीत १०० टक्के ब्रॉडबँड योजना मिळेल जी अन्य जिल्ह्यांसाठी एक मॉडेल म्हणून काम करेल असंही ते म्हणाले.

५ हजरांपेक्षा अधिक बुकिंगमीडिया रिपोर्ट्सनुसार स्टारलिंकच्या सांगण्याप्रमाणे त्यांना भारतात ५ हजारांपेक्षा अधिक प्री-बुकिंग ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनी प्रति ग्राहक ९९ डॉलर्स अथवा ७३५० रूपये आकारात आहे. तसंच बीटा टप्प्यात ५० ते १५० एमबीपीएस प्रति सेकंद स्पीड देण्याचा दावाही करत आहे. दरम्यान, सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेलसारख्या कंपन्या सेवा देत आहेत, अशातच मस्क हे भारतात का सेवा देऊ इच्छित आहेत, असा प्रश्न उपलब्ध केला जात आहे.

काय आहे StarLink?एलॉन मस्क हे स्टारलिंक द्वारे इंटरनेट सेवा पुरवत आहेत. दरम्यान, भारतात ते याची सुरूवात करू इच्छित आहेत. या सेवेची सुरूवात करण्यासाठी मस्क यांना रेग्युलेटरीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. एलन मस्क हे अमेरिकेसहित काही देशांमध्ये आपली सेवा देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या ही सेवा १५०० पेक्षा अधिक सॅटेलाईट्सद्वारे पुरवण्यात येत आहे. कंपनी प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात १२ हजार सॅटेलाईट लाँच करू शकते.

टॅग्स :इंटरनेटव्होडाफोनआयडियारिलायन्स जिओ