Join us

व्याजाच्या दरवाढीची चौथी 'माळ'; कर्जदारांच्या बजेटचे 'सीमोल्लंघन'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 10:00 AM

कर्ज महागणार : रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा रेपो दरात वाढ, पतधोरण जाहीर

मुंबई : चलन वाढ नियंत्रणात येत नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली. गेल्या पाच महिन्यांत झालेली ही चौथी दरवाढ असून, पाच महिन्यांत व्याजदरात एकूण १.९० टक्के वाढ झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची दोनदिवसीय बैठक शुक्रवारी संपली. या बैठकीअंती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरातील वाढीची घोषणा केली. या दरवाढीमुळे ५.४ टक्क्यांवर असलेला रेपो दर आता ५.९ टक्के झाला आहे.

किती वाढणार मासिक हप्ता?

  • गेल्या पाच महिन्यांतील . ९०% दरवाढीनंतर मासिक हप्त्यामध्ये ५८०० रुपयांची वाढ झालेली आहे.
  • ज्या लोकांनी २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, त्यांना आता मासिक हप्त्यापोटी ४३,७७१ रुपये भरावे लागतील. मे महिन्यापर्यंत हाच मासिक हप्ता ३७,९२९ रुपये इतका होता.
  • गेल्या पाच महिन्यांतील १.९०% दरवाढीनंतर मासिक हप्त्यामध्ये ५८०० रुपयांची वाढ झालेली आहे. 

बाजारातील घसरणीला ब्रेक; निर्देशांकांत १ हजार अंकांनी वाढसुरू असलेल्या घसरणीला आरबीआयच्या बैठकीमुळे ब्रेक लागला. बैठकीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजारापेक्षा अधिक अंकांनी वाढून बंद झाला. अपेक्षेनुसार व्याजदार ०.५० टक्क्यांची वाढ आणि महागाई येत्या जानेवारीपासून नियंत्रणात येण्याच्या अंदाजामुळे बाजारात तेजी आली. भारतीय बाजारात वाढ झाली असली तरी जगभरातील शेअर बाजार शुक्रवारीही कोसळले आहेत. 

डिसेंबरमध्ये पुन्हा अर्धा टक्का वाढ?पतधोरण समितीची बैठक आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता त्या बैठकीमध्येदेखील रेपो दरात आणखी अर्धा टक्का वाढ होण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

ठेवींवरील व्याजदर वाढणाररेपो दरात वाढ झाल्यानंतर जितक्या तातडीने कर्जावरील व्याजदरात वाढ केली जाते तितक्या तातडीने बँका मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करत नाहीत किंवा जितकी वाढ झाली आहे तितकी मुदत ठेवींमध्ये देत नाहीत. तरी या दरवाढीनंतर काही प्रमाणात पुन्हा एकदा मुदत ठेवींवरील दरात वाढ होताना दिसेल. गेल्या वर्षभरात मुदत ठेवींमध्ये सरासरी एक टक्का वाढ झाली आहे.

गॅस किमतीचा स्फोटवीजनिर्मिती, खत तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती शुक्रवारी जागतिक स्तरावर तब्बल ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

एचडीएफसीचे कर्ज घेणे महागले एचडीएफसीनेही कर्जाच्या व्याजदरात ५० बेसिस पॉइंटने वाढीची घोषणा केली आहे. ही वाढ १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होईल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास