मुंबई : केंद्रात रालोआचे सरकार येणार या भावनेमुळे मंगळवारी उच्चांकापर्यंत उसळी घेणारा मुंबई शेअरबाजार आज शांत झाला असून, नफेखोरी व विक्री यामुळे आज निर्देशांकात ५६ अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा व महिंद्रा यांच्या शेअर्सबाबत नफेखोरी दिसून आली. एक्झिट पोलमुळे उत्साहित झालेल्या मुंबई शेअरबाजाराचा ३० शेअरचा निर्देशांक मंगळवारी २४ हजारांपर्यंत पोहोचला होता. २४,०६८.१२ पर्यंत पोहोचणार्या निर्देशांकाने गाठलेला हा उच्चांक होता. गेल्या चार सत्रात बाजारात तेजीचे वातावरण होते, निर्देशांकाने १,५४७ अंकांची बढत घेतली होती. परदेशी भांडवलाचा ओघही मजबूत होता. आज बाजारात अस्थिर वातावरण होते. वरखाली होणारा निर्देशांक प्रथम २३,८९७.८८ पर्यंत घसरला, नंतर तो २३,९६४.६७ पर्यंत वाढला, बंद होताना २३,८१५.१२ वर थांबला असून, ही ५६.११ अंकांची घट आहे किंवा ०.२४ टक्के नुकसान आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वा निफ्टीमध्ये आज फारसे बदल झाले नाहीत. गेल्या चार सत्रात ४५६ अंकांचा लाभ मिळविणारा हा निर्देशांक ७,१०८.७५ वर बंद झाला. दिवसभरात ७०८०.९० वरून ७,१४२.२५ पर्यंत वरखाली झाला. मंगळवारी हा निर्देशांक ७,१७२.३५ अंकांपर्यंत चढला होता. हा उच्चांक होता. बोनान्झा पोर्टफोलिओचे सहायक अधिकारी हिरेन धाकन यांच्या मते बाजार रालोआ विजयी होण्याची व उद्योगास अनुकूल असे सरकार सत्तेवर येण्याची वाट पाहत आहे. सध्याच्या मूल्यांकनाच्या पातळीवर निर्देशांक अजूनही वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
तेजीचा उच्चांक गाठल्यानंतर शेअर बाजारात विक्रीला जोर
केंद्रात रालोआचे सरकार येणार या भावनेमुळे मंगळवारी उच्चांकापर्यंत उसळी घेणारा मुंबई शेअरबाजार आज शांत झाला असून, नफेखोरी व विक्री यामुळे आज निर्देशांकात ५६ अंकांची घसरण झाली आहे.
By admin | Published: May 15, 2014 03:45 AM2014-05-15T03:45:36+5:302014-05-15T04:20:25+5:30