लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील वृद्धी ८ महिन्यांच्या नीचांकावर पोहोचली. कारखाना उत्पादनाच्या वृद्धीतील घसरण आणि विक्री व नवीन निर्यात ऑर्डर्समधील नरमाई यामुळे हा फटका बसला आहे.
उत्पादन क्षेत्राचा पीएमआय सप्टेंबरमध्ये घसरून ५६.५ वर आला. नव्या नियुक्तीचे प्रमाणही घटले. मात्र, उत्पादन क्षेत्रातील राेजगारात ७.६ टक्के वाढ झाली आहे.
या क्षेत्रातील राेजगार १.८४ काेटींनी वाढले आहेत. २०२२-२३ मधील ही आकडेवारी असून, कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन ५.५ टक्क्यांनी वाढले. केंद्र सरकारच्या औद्याेगिक क्षेत्राच्या वार्षिक सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली.
उत्पादन क्षेत्रामध्ये
असे वाढले राेजगार
वर्ष कर्मचारी
२०१८-१९ १.६०
२०१९-२० १.७०
२०२०-२१ १.६१
२०२१-२२ १.७२
२०२२-२३ १.८४
असा वाढला पगार
वर्ष कर्मचारी
२०१८-१९ १.६९
२०१९-२० १.७५
२०२०-२१ १.७७
२०२१-२२ १.९४
२०२२-२३ २.०५