Join us  

ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांनी सुरू केली नोकरभरती

By admin | Published: January 20, 2017 5:43 AM

तिमाहीत मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली

नवी दिल्ली : नोटाबंदीचा परिणाम कमी होऊ लागल्यामुळे पुढील तिमाहीत मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. त्यामुळे रोजगाराच्या क्षेत्रात वृद्धी दिसत आहे. बिस्कीट कंपनी ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले की, मागणीत घट झाली आहे. हा परिणाम तात्पुरता राहणार असल्याने २0१७ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत मागणी वाढणारच आहे. त्यामुळे नोकरभरती बंद केलेली नाही. पेप्सिको इंडियाचे चेअरमन डी. शिवकुमार यांनी ग्राहक वस्तू उद्योगावर नोटाबंदीचा परिणाम झाल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, ‘मागणी वाढेल या अपेक्षेने आम्ही नोकरभरती सुरू केली आहे.’ (वाणिज्य प्रतिनिधी)>परिस्थिती सुधारली नेस्टले, प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि डाबर या कंपन्यांनीही हेच सांगितले. हिंदुस्तान युनिलिव्हरने मात्र आपला व्यवसाय नेहमीसारखाच सुरू असल्याचे नमूद केले. या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्रातील कनिष्ठ आणि मध्यम पातळीवर नोकरभरती ठप्प झाली होती; पण आता परिस्थिती सुधारली आहे. वरिष्ठ पातळीवरील भरतीवर नोटाबंदीचा परिणाम झालेला नव्हता.