नवी दिल्ली : मीडियातील आघाडीची कंपनी एनडीटीव्हीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. त्यामुळे एनडीटीव्हीच्या कर्मचा-यांवर कपातीची टांगती तलवार असणार आहे. मुख्य बिझनेसकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी काही अंतर्गत बदल करण्यासाठी जवळपास 25 टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
आमच्याकडे असलेल्या कर्माचा-यांपैकी 25 टक्के कर्मचारी पुढील महिन्यात कमी करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यामुळे कर्मचा-यांनी दिलेल्या त्यांच्या कठिण कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल आभारी आहोत. तसेच, कमीत कमी खर्च करण्यासाठी आणि नफा वाढविण्याच्या दृष्टीकोनातून एक अंमलबजावणी योजना आखण्यात आली आहे. या योजनेचा एक भाग म्हणजे गेल्या तिमाहीत ही अंमलबजावणी करण्यात आली होती. यामध्ये मोबाइल पत्रकारितासहित नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
याचबरोबर, आपल्या मुख्य बिझनेसकडे जास्त फोकस करण्यात येणार आहे. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी वृत्तवाहिन्या आणि एनडीटीव्ही कन्व्हर्जन्स आणि न्यूज व इतर अॅप चालविणारी डिजिटल टीम यांचा समावेश आहे, असेही एनडीटीव्हीने सांगितले.
एनडीटीव्हीच्या कर्मचा-यांवर कपातीची टांगती तलवार, 25 टक्के कर्मचारी करणार कपात
मीडियातील आघाडीची कंपनी एनडीटीव्हीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्य बिझनेसकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी काही अंतर्गत बदल करण्यासाठी जवळपास 25 टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 11:49 PM2017-12-19T23:49:23+5:302017-12-19T23:57:07+5:30
मीडियातील आघाडीची कंपनी एनडीटीव्हीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्य बिझनेसकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी काही अंतर्गत बदल करण्यासाठी जवळपास 25 टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
Highlightsएनडीटीव्हीच्या कर्मचा-यांवर कपातीची टांगती तलवार5 टक्के कर्मचारी पुढील महिन्यात कमी करण्याचा विचारकर्मचा-यांच्या योगदानाबद्दल आभारी