नवी दिल्लीः मार्च महिन्यात होळीपूर्वीच नोकरदारांसाठी EPFO मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. वित्त वर्ष 2019-20साठी पीएफचे व्याजदर घटवले जाऊ शकतात. केंद्रीय विश्वस्त मंडळा(सीबीटी)ची 5 मार्च 2020ला व्याजदारांच्या आढाव्यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सद्यस्थितीतील व्याजदर कायम ठेवणं अवघड आहे. ईपीएफओला मिळणाऱ्या परताव्याची समीक्षा केल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. याचा सरळ प्रभाव 6 कोटी खातेदारांवर पडणार आहे. गेल्या वर्षी 2019च्या आर्थिक वर्ष 2018-19मध्ये व्याजदर ठरवण्यात आले होते. सध्या EPFOमधील खातेदारांना जमा रकमेवर 8.65 टक्के व्याज मिळतं.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) म्हणजेच EPF ही पगारदारांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा पोहोचवणारी योजना आहे. जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था चालवते. या योजनेवरील व्याजदर सरकार निश्चित करते. दर महिन्याला कंपनी सर्व कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातील 12 टक्के पैसे कापून PF खात्यात टाकते. कर्मचाऱ्यांबरोबरच कंपनीकडूनही 12 टक्के कर्मचाऱ्यांच्या खात्यात योगदान दिलं जातं.
भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढEPFOने नोकरदारांना दिला मोठा अलर्ट; 'या' ऑफर्सपासून राहा सावध!5 मार्चला व्याजदराच्या आढाव्याविषयी महत्त्वाची बैठक- दिल्लीत सीबीटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफवरचे व्याजदर ठरणार आहेत. आर्थिक वर्ष 2019-20मध्ये व्याजदर कमी करण्याचा निर्णय होऊ शकतो. परंतु हा निर्णय ईपीएफओला मिळणाऱ्या परताव्याची समीक्षा केल्यानंतर घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या खात्यातील रकमेवर मिळत असलेलं 8.65 टक्के व्याज कायम राहणं अवघड आहे. तसेच व्याजदर 0.10 टक्क्यानं कमी होऊ शकते. व्याज कमी करताना आधीच अतिरिक्त असलेली रक्कम ध्यानात घेण्यात येणार आहे. ईपीएफओजवळ आता 151 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम आहे. सरकारनं काही दिवसांपूर्वीच GPF म्हणजे जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या नव्या व्याजदरांची घोषणा केली होती. 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2020पर्यंत GPF आणि दुसऱ्या फंडांवर 7.9 टक्के व्याज मिळणार आहे. GPF खातं सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच असतं. ही एक प्रकारची निवृत्तीनंतरची योजना आहे. कारण याची रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळते. सरकारी कर्मचारी आपल्या पगारातील 15 टक्के GPF खात्यात योगदान देऊ शकतात. या खात्यातील 'एडवान्स' फीचर्स सर्वात विशेष आहे. गरज पडल्यास कर्मचारी GPF खात्यातून पैसे काढू शकतात. त्यावर कोणतंही व्याज मिळत नाही.