निवृत्त महिला अधिकार्याला सक्तमजुरी
By admin | Published: September 29, 2014 09:46 PM2014-09-29T21:46:38+5:302014-09-29T21:46:38+5:30
>- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दोषी पुणे : कोट्यवधी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी प्राप्तीकर विभागातील निवृत्त महिला अधिकार्याला सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी साडेतीन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.नाझिरा अजिम सय्यद (६२, रा. ३३७, भवानी पेठ) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. आयुब इनामदार यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे त्याबाबत तक्रार दिली होती. नाझिरा सय्यद या ३१ डिसेंबर २०१२ रोजी निवृत्त झाल्या होत्या. निवृत्त होण्यापूर्वी इनामदार यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी २५ हजारांची लाच मागितली होती. त्या गुन्ह्यात त्यांची निदार्ेष मुक्तता झाली, मात्र त्यांचा सहकारी माधवनला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. संबंधित फिर्यादीच्या अनुषंगाने सीबीआयने तपास केल्यानंतर सय्यद राहत असलेल्या दहा बाय दहाच्या घरातून सीबीआयने तब्बल २६ लाख ८४ हजार रूपयांची रोकड हस्तगत केली होती. नाझिरा यांनी १० पेक्षा जास्त बँकांमध्ये मुदत ठेवींमध्ये रक्कम गुतंविली होती.सीबीआयने तब्बल ९४ लाख ५८ हजार ६६८ रूपयांची मालमत्ता सय्यद यांच्याकडून जप्त केली. संबंधित मालमत्ता त्यांच्या उत्पन्नाच्या ३७६ टक्के अधिक होती. नाझिरा यांच्यावर ३१ डिसेंबर २०१२ रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. तर १२ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोप निश्चित झाले. सीबीआयच्या तपास अधिकारी सुजाता तनवडे यांनी गुन्ह्याचा तपास केला. सीबीआयचे अतिरिक्त सरकारी वकील आयुब पठाण यांनी १९ साक्षीदारांची तपासणी केली होती. (प्रतिनिधी)-----------------------