Lokmat Money > बिझनेस न्यूज > मालक, कर्मचारी पगार एकसारखाच! सर्वांना सरसकट ५१ लाख रु. वेतन; अमेरिकन कंपनीचा धाडसी प्रयोग यशस्वी

मालक, कर्मचारी पगार एकसारखाच! सर्वांना सरसकट ५१ लाख रु. वेतन; अमेरिकन कंपनीचा धाडसी प्रयोग यशस्वी

सर्व कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ५१ लाख करण्यासाठी सीईओ डॅन प्रिस यांना त्यांचे वार्षिक वेतन ७ कोटींनी कमी करावे लागले होते. या निर्णयानंतर अनेकांनी डॅन प्रिस यांना ‘हिरो’ म्हटले होते; तर काहींनी कंपनी दिवाळखोरीत जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. ही कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग क्षेत्रात काम करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:28 PM2021-09-23T12:28:54+5:302021-09-23T12:29:19+5:30

सर्व कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ५१ लाख करण्यासाठी सीईओ डॅन प्रिस यांना त्यांचे वार्षिक वेतन ७ कोटींनी कमी करावे लागले होते. या निर्णयानंतर अनेकांनी डॅन प्रिस यांना ‘हिरो’ म्हटले होते; तर काहींनी कंपनी दिवाळखोरीत जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. ही कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग क्षेत्रात काम करते.

Employers, employees pay the same! RS 51 lakh Salary to all; The American company's daring experiment was successful | मालक, कर्मचारी पगार एकसारखाच! सर्वांना सरसकट ५१ लाख रु. वेतन; अमेरिकन कंपनीचा धाडसी प्रयोग यशस्वी

मालक, कर्मचारी पगार एकसारखाच! सर्वांना सरसकट ५१ लाख रु. वेतन; अमेरिकन कंपनीचा धाडसी प्रयोग यशस्वी

नवी दिल्ली : अमेरिकेतील ग्रॅव्हिटी पेमेंट्स या कंपनीने ६ वर्षांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन समान असावे, हे तत्त्व अंगीकारून प्रत्येक कर्मचाऱ्याचे किमान वार्षिक वेतन सुमारे ५१ लाख रुपये (७० हजार डॉलर) केले होते. आता कंपनीचे सीईओ डॅन प्रिस यांनी म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचे धोरण यशस्वी झाले आहे. 

सर्व कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ५१ लाख करण्यासाठी सीईओ डॅन प्रिस यांना त्यांचे वार्षिक वेतन ७ कोटींनी कमी करावे लागले होते. या निर्णयानंतर अनेकांनी डॅन प्रिस यांना ‘हिरो’ म्हटले होते; तर काहींनी कंपनी दिवाळखोरीत जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. ही कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग क्षेत्रात काम करते.

डॅन प्रिस यांनी सांगितले की, ग्रॅव्हिटी पेमेंट उत्तम प्रगती करीत आहे. कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६ वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे सीईओ डॅन प्रिस यांनी स्वतःचे वार्षिक वेतन आजही फक्त ५१ लाख रुपयेच ठेवले आहे.

डॅन प्रिस यांनी एका वाहिनीला सांगितले की, वेतन वाढविल्यानंतर कर्मचारी कंपनीशी अधिक निष्ठावान झाले. २०२० मध्ये कोरोना संकट काळात कंपनीची स्थिती बिकट झाली होती. तथापि, काही महिन्यांच्या अडचणीनंतर कंपनी पुन्हा प्रगती करण्यात यशस्वी झाली. 

पगार वाढविण्यात आल्यानंतर ग्रॅव्हिटी पेमेंट्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सीईओला एक आलिशान कार भेट दिली होती. सीईओ डॅन प्रिस म्हणाले की, मी पूर्वीपेक्षा आता खूप आनंदी आहे.
 
Web Title: Employers, employees pay the same! RS 51 lakh Salary to all; The American company's daring experiment was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.