नवी दिल्ली : कोरोना काळातही लाखो लोकांना रोजगार मिळाले आहेत व आता रोजगाराची स्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने केला. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेत (ईपीएफओ) जवळपास ३९ लाख ३३ हजार नवीन खातेधारकांची भर पडली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात नवीन खातेधारकांच्या संख्येत ५६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. २०१९च्या तुलनेत हे प्रमाण ७.३९ लाखांनी अधिक आहे.
एकट्या ऑक्टोबर महिन्यात ११ लाख ५५ हजार खातेधारकांची नोंदणी करण्यात आली आहे, ज्यात २.०८ लाख महिला खातेधारक आहेत. या वर्षी नवीन महिला खातेधारकांच्या संख्येचा वाटा २१ टक्के इतका आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात सर्व वयोगटांतील कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वेतनात ५३ टक्क्यांनी वाढ झाल्याचा श्रम व रोजगार मंत्रालयाने सांगितले. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यात रोजगारात वाढ नोंदविण्यात आली आहे.
कोरोना काळातही वाढले रोजगार; ईपीएफओमध्ये ३९ लाख ३३ हजार नवे खातेधारक
Employment : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात नवीन खातेधारकांच्या संख्येत ५६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:56 AM2020-12-22T05:56:32+5:302020-12-22T05:56:52+5:30